आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत गुन्हा करण्याचा कट रचला होता, असा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर करताना दिलेल्या तपशीलवार आदेशात म्हटले आहे. क्रूझ शिप ड्रग न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी 28 ऑक्टोबर 2021 रोजी या तिघांना जामीन मंजूर केला होता. आदेशाची तपशीलवार प्रत आज उपलब्ध करण्यात आली. त्यांच्यावर NDPS कायद्याच्या कलम 20(b), कलम 27, 28, 29 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांकडून वानखेडेंची पाठराखण, म्हणाले…)
असे म्हटले आदेशात
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला ३० ऑक्टोबर रोजी जामीन देण्यात आला होता. आर्यनच्या जामीन ऑर्डरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, असे या आदेशात म्हटले गेले आहे.
ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज खान आणि मूनमून धमेचा हिच्याकडे ड्रग्ज सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज आणि मूनमून यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं जामीन आदेशात केली आहे. तसंच, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.