समुद्रात वादळाचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून पुढील ३ महिने रायगड जिल्ह्यातील समुद्र पर्यटन बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे २६ मे ३१ ऑगस्टदरम्यान पर्यटन बंद राहणार असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आली आहे. मान्सून कालावधी पर्यटनासाठी समुद्रात गेलेल्या पर्यटकांसोबत अनेक अपघात घडतात. या कारणामुळे जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जलवाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने जंजिरा किल्ला देखील पुढील तीन महिने पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जात असाल तर या काळजी घ्या.
(हेही वाचा – DGCA ची मोठी कारवाई, Indigo एअरलाईन्सला ५ लाखांचा दंड)
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागसह नागाव, काशीद, मुरूड या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मेरिटाईम बोर्डाच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील तीन महिने समुद्री पर्यटन बंद असल्याने पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा आणि माथेरान या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यात समुद्र पर्यटनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देत असतात. या ठिकाणी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी उन्हाळा किंवा हिवाळ्यात समुद्रात जाण्याचा कोणताही धोका नसतो. परंतु पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे वादळाचा धोका लक्षात घेता समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या जीवनाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ मेपासून पुढील तीन महिने पर्यटकांकरता समुद्री पर्यटन बंद ठेवण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community