नागपंचमीला साप किंवा नागाला दूध पाजताय, तर ही बातमी नक्की वाचा…

115

भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो. यासाठी सापाला किंवा नागाला पकडून दूध पाजण्याचीही प्रथा आहे. सापाच्या मूर्तीचे पुजत कित्येकदा जिवंत नागाला किंवा सापाला पकडून दूध पाजण्याचा विचार करत असाल तर ही माहिती नक्की वाचा…

(हेही वाचा – रेशन कार्ड धारकांना सरकारकडून दिलासा! आता FREE मिळणार LPG सिलिंडर)

० साप किंवा नाग दूध पित नाही. दूध हे त्यांचे अन्न नाही.
० गेल्या काही वर्षांत नागाला नागपंचमीसाठी खास करुन जंगलातून पकडले जात आहे. पुजेसाठी नागाला किंवा सापाला कुंकू लावणे, दूध पाजणे, वारुळ शोधून साप पकडणे अशा चुकीच्या पद्धतींमुळे त्यांचा नैसर्गिक अधिवासही धोक्यात येऊ शकतो.
० सापांची तस्करी करताना कित्येकदा साप जखमी होतात, मरणही पावतात.
० शेतातील बिळात राहणारे हे जीव शेतक-यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. बिळात शेतजमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला होतो. शेतीतील पिकांची नासाडी करणारे उंदीर हे सरपटणा-या प्राण्याचे अन्नही असल्याने शेतक-याला मदत होते.

वनाधिका-यांकडून मुस्क्या आवळल्या जाणार

साप किंवा नाग भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९४२ नुसार संरक्षित आहेत. साप किंव नागाची अवैध तस्करी किंवा विक्री वनगुन्हा आहे. त्यामुळे या सरपटणा-या प्राण्याला इजा पोहोचवणा-याला वनविभागाच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.

१९२६ या हेल्पलाईन क्रमांकाला कळवा

राज्य वनविभागाने वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी १९२६ हा मोफत हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. विशेषकरुन नागपंचमीच्या दिवशी तुम्ही मूक्या सरपटणा-या प्राण्यांचा छळ होताना पाहिलेत तर वनविभागाच्या या हेल्पलाईन क्रमांकाला जरुर कळवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.