पैसे नाहीत म्हणून सरकारने परीक्षाच केली रद्द!

160

तुम्ही असं कधी ऐकले आहे का, की सरकारकडे पैसाच नाही म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षाच रद्द केल्यात… हे जरी अतिश्योक्ती वाटत असलं तरी ते खरं आहे. मागील काही महिन्यांपासून भारताचा शेजारील देश श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. श्रीलंकेतील महागाईने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले असून हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे आता समोर आले आहे. तेथे महागाई वाढल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. प्रश्नपत्रिका छपाईसाठी पैसाच नसल्याने शाळा-महाविद्यालयातील परीक्षाच रद्द करण्याचा शेवटचा पर्याय श्रीलंकन सरकारपुढे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेतील महागाई दर १६ टक्क्यांवर

श्रीलंकन सरकारने उद्यापासून सुरू होणाऱ्या सहामाही आणि वार्षिक परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहे. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उधवस्त होणार असून त्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे. श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिल्यांदाच इतकी महागाई निर्माण झाली आहे. आशियातील इतर देशांच्या तुलनेत श्रीलंकेतील महागाई दर १६ टक्क्यांवर गेला असून तो सर्वाधिक आहे.

(हेही वाचा – Russia-Ukrain War: मृत्यूच्या भयाने पुतीन यांनी उचलले ‘हे’ पाऊल!)

सरकारी तिजोरीत पैसे नाहीत…

सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने परीक्षेसाठी आवश्यक कागद, प्रिंटर, आणि शाई खरेदी करता येत नसल्याने श्रीलंकेतील शाळांना नियेजित असलेल्या परीक्षा रद्द कराव्यात, असे आवाहन श्रीलंकन सरकारच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. श्रीलंकन सरकारच्या या निर्णयामुळे या देशातील साधारण ४५ लाख विध्यार्थ्यांचे शिक्षण संकटात सापडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महागाईचा दर श्रीलंकेत वाढल्याने श्रीलंकन सरकारकडील परकीय चलन साठा कमालीचा घटला आहे. दरम्यान, परकीय चलन नसल्याने या सरकारला इंधन, औषधांसह जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्यासाठी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे देशात भूकबळी जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ो

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.