तुमच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देताय! तर ‘या’ गोळ्या चुकूनही देऊन नका

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर अद्याप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे सर्वाधिक नागरिकांचे वेगाने लसीकरण कसे होईल यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. तर साधारण १ कोटींपर्यंत मुलांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे बहुतांश जण लसीकरणानंतर पेन किलर, पॅरासिटामॉल गोळी औषध म्हणून घेत आहे. या संदर्भात बुधवारी भारत बायोटेकने एक परिपत्रक काढून लस घेतल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे स्पष्ट केले आहे. कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांनी पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेणं टाळा असं आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.

काय म्हटले भारत बायोटेक

आम्हाला अभिप्राय मिळाला आहे की, काही लसीकरण केंद्रं मुलांसाठी कोव्हॅक्सिनसह 3 पॅरासिटामॉल 500 मिलिग्राम गोळ्यांची शिफारस करत आहेत. परंतु, लसीकरणानंतर कोणतीही पॅरासिटामॉल किंवा पेन किलर घेण्याची शिफारस केली जात नाही, असे भारत बायोटेकने म्हटले आहे. यासह पुढे असेही सांगितले की, या पत्रकात 30000 व्यक्तींच्या क्लिनिकल चाचण्यांचा हवाला देत सांगितले की, साधारण 10-20 टक्के व्यक्तींना याचे दुष्परिणाम जाणवले आहेत. तर अनेकांना सौम्य दुष्परिणाम जाणवतात. पण ही लक्षणे साधारणत: 1-2 दिवसांत नाहीसे होतात. त्यांना औषधांची गरज नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पेन किलर किंवा गोळी डॉक्टरांच्या सल्लानुसार घ्यावी असे कंपनीने म्हटले आहे.

(हेही वाचा – तुमचा डॉक्टर पॉझिटिव्ह तर नाही ना! आतपर्यंत राज्यात २९१ निवासी डॉक्टरांना कोरोना)

पहिल्याच तीन दिवसात 1.06 कोटीहून जास्त मुलांचे लसीकरण

कोरोनाची लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावरच नागरिकांना पॅरासिटामॉल ही गोळी कोणताही त्रास लस घेतल्यानंतर होऊ नये म्हणून दिली जात होती. मात्र कंपनीचं असं मत आहे की, इतर काही कोरोना लसींसोबत पॅरासिटामॉलची शिफारस करण्यात आली होती. पंरतु. कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर त्याची आवश्यकता नाही. देशभरात 15 ते 18 वर्षांच्या मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जात आहे. पहिल्याच तीन दिवसात 1.06 कोटीहून अधिक मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here