मुंबई हे गर्दीचे ठिकाण असून तेथे रोज नवी बांधकामे होताना दिसत आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाहनं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावताना दिसत आहेत. त्यामुळे दादर, माहीम किंवा दक्षिण मुंबईत कुठेही गर्दीच्या ठिकाणी वाहने उभी करायला जागाच राहिलेली नाही. अशावेळी नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण, आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईकरांना पार्किंगचे टेन्शन राहणार नाही. कारण, रस्त्यावर कुठेही वाहने उभी करण्यापेक्षा भूमिगत पार्किंग सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही बिनधास्त गाडी पार्क करू शकतात. कारण, मुंबईत आता असं पार्किंग उभारणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – प्लास्टिकचे होणारे प्रदूषण आता थांबणार, शास्त्रज्ञांनी शोधले Superworms!)
मुंबई महापालिका वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी भूमिगत पार्किंगचा विचार करत असून, विभागीय स्तरावर याचे नियोजन असणार आहे. वाहतूक विभागाशी सल्लामसलत करून कोणत्या ठिकाणी अशा पार्किंगची गरज आहे ? याचा विचार केला जाणार आहे, त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे भूमिगत पार्किंग यशस्वी ठरले तर, पार्किंगच्या समस्येवर तोडगा निघण्यास मदत होईलच तसेच मुंबईकरांची पार्किंगची मोठी समस्या सुटेल.
याठिकाणी देणार सुविधा
मुंबईत ३५ लाख वाहने आहेत. तर हजारामागे ३६१ जणांकडे स्वतःचे वाहन आहे. प्राथमिक स्तरावर माटुंगा, फ्लोरा फाऊंटन आणि झवेरी बाजार येथे भूमिगत पार्किंगचे नियोजन करण्यात येणार आहे. असे सांगितले जात आहे की, २० वर्षांसाठी प्रकल्पाच्या वार्षिक देखभालीची जबाबदारी संपूर्णपणे कंत्राटदाराची असेल.
महापालिकेतर्फे आता वॉलेट पार्किंग
महापालिकेतर्फे दादरमध्ये आता वॉलेट पार्किंगची संकल्पना अंमलात आणली जात आहे. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि भौगोलिक माहिती प्रणाली यांचा नावीन्यपूर्ण उपयोग करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community