रवींद्रनाथ (Rabindranath) ठाकूर यांचा जन्म ७ मे १८६१ साली कोलकातातील जोरासंको मेंशन येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ ठाकूर आणि आईचं नाव शरदादेवी असं होतं. रवींद्रनाथ ठाकूर यांची आई त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेली होती आणि त्यांच्या वडिलांना कामानिमित्त सतत फिरावे लागायचे. त्यामुळे रवींद्रनाथ ठाकूर यांचा सांभाळ त्यांच्या नोकरदार वर्गानेच केला. बंगालचे पुनर्जागरण करण्यात ठाकूर कुटुंबाने आघाडी धरली होती. त्यांच्या कुटुंबाने साहित्यिक मासिकाच्या प्रकाशनाचं आयोजन केलं होतं. ते बंगाली आणि वेस्टर्न क्लासिकल संगीताचे नाट्य आणि गाण्याचे कार्यक्रम नियमितपणे करायचे.
ज्यूडोचं शिक्षण घेऊन बऱ्यापैकी शरीर कमावलं
रवींद्रनाथ (Rabindranath) ठाकूर यांच्या वडिलांनी अनेक व्यावसायिक धृपद संगीतकार आणि गायकांना घरात राहण्यासाठी आमंत्रित केले होते. तसेच अनेक मुलांना शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन ते आपल्या घरी राहण्यास आमंत्रित करायचे. रवींद्रनाथ ठाकूर यांनी चित्रकला, साहित्य, भूगोल, इतिहास, शरीरशास्त्र, गणित, संस्कृत आणि इंग्रजी हे विषय अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यासलेले होते. त्याशिवाय त्यांना ट्रेक करायला, गंगा नदीत पोहायला आवडायचं. त्यांच्या भावाकडून त्यांनी कुस्ती, जिम्नॅशिअम आणि ज्यूडोचं शिक्षण घेऊन बऱ्यापैकी शरीर कमावलं होतं. योग्य शिक्षणामुळे उत्सुकता वाढते असे त्यांचे मत होते.
बंगाली भाषेत शीख धर्माविषयी सहा कविता देखील लिहिल्या
वयाच्या अकराव्या वर्षी रवींद्रनाथ ठाकूर यांच्यावर उपनयन संस्कार करण्यात आले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत १८७३ साली कोलकता सोडून भारत दौऱ्यावर निघाले. ते दोघे डलहौसीच्या हिमालयातील हिलस्टेशनवर पोहोचण्याआधी त्यांनी अमृतसर आणि शांतीनिकेतनला भेट दिली. अमृतसरला त्यांनी एक महिना वास्तव्य केले. त्या एका महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी अनेकांची चरित्रे वाचून काढली. कालिदास यांच्या शास्त्रीय काव्याचं परीक्षण केलं. त्याप्रमाणेच ते सुवर्ण मंदिरामध्ये ऐकू येणाऱ्या मधुर गुरुबानी आणि नानकबानीमुळे खूप प्रभावित झाले होते. रवींद्रनाथ (Rabindranath) ठाकूर यांनी बंगाली भाषेत शीख धर्माविषयी सहा कविता देखील लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता आणि कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.
रवींद्रनाथ (Rabindranath) ठाकूर यांनी लिहिलेली प्रसिद्ध कविता आपलं राष्ट्रगीत हे आपल्याला वेगळं काय सांगायचं..गीतांजली हा त्यांचा सर्वोत्कृष्ट काव्य संग्रह मानला जातो आणि यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळाला आहे. भारताचं राष्ट्रगीत रचून रवींद्रनाथांनी भारताचा सन्मान उंचावला आहे.
Join Our WhatsApp Community