युजीन विग्नर (Scientist Eugene Wigner) हे हंगेरियन वंशाचे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी गणितीय भौतिकशास्त्रातही आपले योगदान दिले आहे. ते बर्लिनच्या टेक्निकल विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यांनी बर्लिनमधील कैसर विलहेल्म इन्स्टिट्यूटमध्ये कार्ल वेसेनबर्ग आणि रिचर्ड बेकर आणि गॉटिंगेन विद्यापीठात डेव्हिड हिल्बर्ट यांचे सहाय्यक म्हणून काम केले आहे. विग्नर आणि हर्मन वेयल यांनी फिजिक्समधील ग्रूप थियरी, विशेषत: फिजिक्समधील थियरी ऑफ सिमेट्री मांडली होती.
त्यांनी (Scientist Eugene Wigner) गणितात अभूतपूर्व कार्य करुन दाखवले आहे. ज्यामध्ये त्यांनी अनेक गणितीय प्रमेयांचे लेखन केले. अणु केंद्रकांच्या संरचनेतील संशोधनासाठीही त्यांचे नाव अभिमानाने घेतल१ जाते. १९३० मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने विग्नर (Scientist Eugene Wigner) यांना सन्मानाने नोकरी दिले. मग ते युनायटेड स्टेट्समध्ये गेले, जिथे त्यांना १९३७ मध्ये नागरिकत्व देखील मिळाले. विशेष म्हणजे अणुबॉम्ब बनवण्यात त्यांचे योगदान होते.
(हेही वाचा – Supreme Court : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्तींसाठी आचारसंहिता )
विग्नर (Scientist Eugene Wigner) हे देशभक्त होते आणि त्यांना अशी भीती वाटत होती की जर्मनी त्यांच्या आधी अणुबॉम्ब विकसित करेल. पण अमेरिकेचा निश्चय झाला होता. त्यांना काही करुन जगातला पहिला अणुबॉम्ब बनवायचा होता. मॅनहॅटन प्रकल्पादरम्यान त्यांनी एका टीमचेचे नेतृत्व केले, ज्यांचे कार्य युरेनियमचे शस्त्रास्त्र ग्रेड प्लुटोनियममध्ये रूपांतरित करण्यासाठी आण्विक अणुभट्ट्यांची (Scientist Eugene Wigner) रचना करणे असे होते.
(हेही वाचा – Balasaheb Thackeray : स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटातील राड्यानंतर ; पोलीस अॅक्शन मोडमध्ये)
तो काळ असा होता की अणुभट्टी प्रत्यक्षात विकसित करणे कठीण होते. दरम्यान ड्युपॉंटला अणुभट्ट्यांच्या डिझाइअन्ची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे ते जरा निराश झाले. १९४७ रोजी क्लिंटन प्रयोगशाळेत संशोधन आणि विकासचे संचालक झाले. मात्र अणुऊर्जा आयोगाच्या दडपशाही वागणुकीमुळे ते हताश झाले आणि प्रिन्स्टनला परतले. युद्धानंतर त्यांनी सरकारी संस्थांमध्ये काम केले. १९४७ ते १९५२ दरम्यान त्यांनी नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅंडर्ड्स, १९५१ ते १९५४ दरम्यान मॅथेमॅथिकल पॅनेल ऑफ नॅशनल रिसर्च काउन्सिल आणि असा अनेक संस्थांमधून त्यांनी सेवा दिली. (Scientist Eugene Wigner)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community