फसवणूक प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विरोधात उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एसीजेएम न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिला 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
2019 मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून हजर राहण्यासाठी सोनाक्षीला 28 लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली होती. मात्र, आगाऊ रक्कम घेऊनही ती या कार्यक्रमाला हजर राहिली नाही. या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी पैसे परत घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे मिळले नाही. अखेर त्यांनी सोनाक्षी सिन्हाविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. आता या प्रकरणी मुरादाबाद न्यायालयाने सोनाक्षी विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करत तिला 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
(हेही वाचा- #RussiaUkraineWar: मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार होतेय का?)
सोनाक्षी सिन्हाने यासाठी सोशल मीडियावर एक प्रमोशन व्हिडिओही जारी केला होता. या कार्यक्रमाला येण्यासाठी 29 लाख 92 हजार रुपये मोजण्यात आले होते. याबाबत प्रमोद शर्मा यांनी 2019 मध्ये काटघर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, परंतु तक्रार नोंदवून न घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community