उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याचे अनेक विक्षिप्त निर्णय आणि फतवे याबद्दल तुम्ही ऐकूनच असाल. आता पुन्हा एकदा किम जोंग उन चर्चेत आला आहे. उत्तर कोरियात हुकूमशाह किम जोंग असल्याने तेथील नागरिकांना कोणत्या आदेशाचं पालन करावं लागेल याचा काही नेम नाही. उत्तर कोरियात आता 11 दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर लोकांनी सेलिब्रेशन केलं किंवा हसताना दिसले तर त्यांच्यावर आता कडक कारवाई होईल, असे सांगितले जात आहे.
‘…म्हणून हसाल तर फसाल’
माजी नेते किम जोंग इल यांच्या 11 व्या जयंतीनिमित्त उत्तर कोरियात शोक पाळण्यात येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांवर 11 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, या देशातील नागरिक हसू शकत नाही, आनंद व्यक्त शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकुमशाह किम जोंग उनचे वडील किम जोंग इल यांच्या निधनाच्या स्मरणार्थ लोकांनी कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नये, असे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे हा राष्ट्रीय शोक असल्यानं लोकांना हसणे आणि दारु पिण्यावर बंदी असणार आहे.
(हेही वाचा – टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप, तुकाराम सुपेंना अटक)
उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, हुकुमशाह किम जोंग उनच्या आदेशानुसार आदेश न मानणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. १७ डिसेंबर रोजी किम जोंग इल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी १७ वर्षे देशावर राज्य केले. त्यांच्या या निधनाने हा शोक दरवर्षी उत्तर कोरियामध्ये १० दिवस व्यक्त केला जातो. यावेळी त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण झाल्याने ११ दिवस शोक व्यक्त केला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी कुणीही बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही. जर नियमांचे उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करण्यात येणार आहे. इतकंच काय तर, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला तरी, त्यांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही आणि ते शोक संपल्यानंतरच मृतदेह बाहेर काढू शकतील असा फतवा किम जोंग उनने काढला आहे.
Join Our WhatsApp Community