दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्रालय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने शुक्रवारी (५जानेवारी) दक्षिण कोरियाच्या दोन बेटांजवळ२००हून अधिक तोफगोळ्यांचा मारा केला, त्यानंतर लगेचच रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात सीमाभागावरून वाद सुरूच आहेत. मात्र दक्षिण कोरियाचे यामध्ये काहीही नुकसान झालेले नाही. (Uttar Korea Vs South Korea)
दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, उत्तर कोरियाने दक्षिणेकडील येओनप्योंग बेटावर २०० तोफगोळे डागले यांनतर लगेचच दक्षिण कोरियान बेटावर राहणाऱ्या दोन हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. दक्षिण कोरियाने या कारवाईचा निषेध केले म्हणून याला ‘प्रक्षोभक कृती’ असे संबोधण्यात आले आहे.Uttar Korea Vs South Korea
(हेही वाचा : China Praise Narendra Modi : चिनी ड्रॅगन नरमला; केली पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा)
युद्धाभ्यास करण्यासाठी तोफगोळ्यांचा सराव
उत्तर कोरियाने युद्धाभ्यास करण्यासाठी तोफगोळ्यांचा सराव केला. नव्या शस्त्रांचा सराव तसेच तपासणी करत असल्याचे सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी अलीकडेच सांगितले की ते दक्षिण कोरिया आणि त्याचा सहयोगी अमेरिकेविरुद्ध युद्धासाठी तयार आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे.
कोणतेही नुकसान झालेले नाही
बेंग्नियोंग बेटावरील एका स्थानिक जिल्हा अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, दक्षिण कोरियाचे सैन्य लवकरच नौदल सराव करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. म्हणूनच आम्ही माघार जाहीर करत आहोत.” कारण हे तोफगोळे दोन्ही देशामधील वास्तविक सागरी नॉर्दर्न लिमिट लाइन च्या उत्तरेला हे तोफगोळे पडले. मात्र कोणतेही नुकसान झाल्याचे चित्र अद्याप समोर आलेले नाही.
हेही पहा –