उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन नेहमीच अजब निर्णयामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा किम जोंग उनने उत्तर कोरियाच्या जनतेसाठी नवं फर्मान जारी केले आहे. हे नवं फर्मान जारी करताना किम जोंग उनने देशातील मुलांची नावं बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर किम जोंग उनने देशात नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.
उत्तर कोरियाच्या जनतेसाठी नवं फर्मान
उत्तर कोरियातील मुलांची नावं गोडं नसावीत, अशी इच्छा किम जोंग उनने व्यक्त केली आहे. तर या देशातील मुलांची नावे बॉम्ब, बंदुक आणि क्षेपणास्त्रांवर असावीत. याचं कारण म्हणजे मुलांच्या नावात मवाळपणाऐवजी देशभक्तीची भावना दिसून येईल, असे त्याचे मत होते. समोर आलेल्या अहवालानुसार, उत्तर कोरियामध्ये लहान मुलांची नाजूक आणि मवाळ अर्थ असलेली नावे बदलून चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई सॉंग (उपग्रह) यांसारखी नावे बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
(हेही वाचा – भारतीय नौदलाच्या नव्या रचनेतील बोधचिन्हाचं अनावरण, असं आहे नवं बोधचिन्ह)
उत्तर कोरियातील नागरिक हैराण
हुकुमशाह किम जोंग उन याच्या नवीन आदेशामुळे उत्तर कोरियातील नागरिक हैराण झाले आहेत. कारण अधिकारी त्यांना मुलांची नावे बदलण्यासाठी सांगत आहे. गेल्या महिन्यात नोटीस दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांना मुलांची नावे बदलण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे.