मे महिन्या्च्या सुरुवातीला विदर्भातील कमाल तापमान ४६ अंशाखाली आले आहे. उन्हाची काहीली अजून तीन दिवस अशीच रहाणार आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज भारतीय वेधशाळेने दिला आहे.
( हेही वाचा : विमानतळावरून आता २४ तास ‘बेस्ट’ सेवा! पहा वेळापत्रक… )
तापमानात वाढ
विदर्भात उष्णतेची झळ कमी होत असताना गेल्या काही दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात चाळीशीपार गेलेले कमाल तापमान आता उकळू लागले आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही दुपारच्या वेळेत वावटळीचा जोर दिसून येत आहे. ही वावटळ दुपारभर कायम राहत असल्याने सायंकाळी वातावरण पूर्ववत होत आहे. तसेच हिंगोलीसह नजीकच्या भागांत पावसाच्या नोंदीही झाल्या आहेत. मात्र बुधवारी राज्यातील कमाल तापमानात अहमदनगर येथे नोंदवले गेले. अहमदनगर येथे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
मध्य महाराष्ट्रात अहमदनरपाठोपाठ सोलापूरात कमाल तापमान ४० अंशापुढे नोंदवले गेले. सोलापूरात कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. तर विदर्भातील सर्व शहरांत कमाल तापमान ४० अंशापलीकडेच नोंदवले जात आहे.