गड मजबूत, तरीही लोढांसमोर अमंगलची भीती

138
दक्षिण मुंबईतील मलबार हिल विधानसभा क्षेत्रात यंदा भाजपची कसोटी लागणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचा हा मतदार संघ असून मागील निवडणुकीत भाजपने दोन अधिक नगरसेवक निवडून आणत नगरसेवकांची संख्या एकूण ४ एवढी केली तर शिवसेनेला २ नगरसेवकांचा फटका बसला. याशिवाय काँग्रेसची संख्या घटली. परंतु २०२२ ची सार्वत्रिक निवडणुक ही शिवसेना, भाजप आणि काँग्रेस साठी महत्वाची आहे. त्यामुळे भाजपच्या लोढा यांच्या समोर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कायम ठेवण्याचे आव्हान आहे, तर शिवसेना आणि काँग्रेस  ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. लोढांचा हा गड मजबूत मानला जातो, तरीही लोढांना मात्र अमंगलची भीती आहेच.

या मतदार संघात भाजपच्या मंगलप्रभात लोढांचे वर्चस्व

 मुंबई मलबार हिल विधानसभा मतदार संघात २०१२ मध्ये शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेनेचे ३ नगरसेवक आणि भाजपचे २ नगरसेवक तर काँग्रेसचे दोन नगरसेवक होते. परंतु २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीत न लढता स्वबळावर लढली. त्यामध्ये भाजपचे दोन ऐवजी चार नगरसेवक निवडून आले. तर शिवसेनेचे तीन ऐवजी केवळ एकमेव नगरसेविका आहे आणि काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. त्यामुळे  २०१२ च्या  निवडणुकीच्या तुलनेत मागील निवडणुकीतया मतदार संघात भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आपले वर्चस्व दाखवून देत चार नगरसेवक निवडून आणतानाच शिवसेनेचे पूर्ण पंख छाटून ठेवले होते. तसेच काँग्रेसचेही अस्तित्व कमी करून टाकले आहे.

दक्षिण मुंबईत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी पूर्ण ताकद 

या मतदार संघावर प्रारंभापासून शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहेत. गिरगावमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून यायचे. परंतु मागील निवडणुकीत गिरगावमधून शिवसेनेचे अस्तित्वच संपवून टाकले. त्यामुळे शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका ज्या निवडून आल्या आहेत, त्या मुंबई सेंट्रल परिसरातील आहे. ज्याठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक निवडून यायचा. परंतु लोढा यांनी काँग्रेसला शह देतानाच शिवसेनेच्या एका जागेवर मेहरबानी दाखवली असली तरी उर्वरीत सर्व जागांवर भाजपने शिवसेनेसह काँग्रेसला डोकेवर काढू दिले नव्हते. परंतु २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२२ ची निवडणूक महत्वाची असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे त्वेषाने लढले जाणार आहे. त्यामुळे आजवर दक्षिण मुंबईत लोढा यांनी आपल्या वेगळ्या राजकारणाची झलक दाखवत आपले उमेदवार निवडून आणले असले तरी येत्या निवडणुकीत लोढा यांच्यासमोर जे चार नगरसेवक निवडून आले आहेत, त्या सर्व जागा अबाधित राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे लोढा यांची मतदार संघाची बांधणी मजबूत असली तरी राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असल्याने त्यांच्याकडूनही तेवढीच ताकद या मतदार संघात लावली जात आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी पूर्ण ताकद लावली जाणार आहे.

कायमच सेनेने भाजपशी तडजोड केली

गिरगावमध्ये प्रमोद नवलकर, विलास अवचट, रविंद्र मिर्लेकर, अरविंद नेरकर, सुरेंद्र बागलकर यांच्यासारखे  नेते होऊ गेले. परंतु युतीच्या नावाखाली कायमच शिवसेनेने भाजपशी तडजोड करत येथील जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेने जागा न सोडल्याने लोढा यांनी आपले समर्थक अनिल सिंह यांना शिवसेनेत पाठवून निवडून आणले होते. सेनेला त्यावेळी आपली एक जागा वाढल्याचा आनंद झाला असला तरी ती मोठी चूक होती, हे आता गिरगांव मधील शिवसैनिक बोलतांना दिसतात.
पूर्वी अरविंद नेरकर हे शिवसेनेचे आमदार बनून गेले. परंतु त्यानंतर शिवसेनेला कधीही याठिकाणी आमदार निवडून आणता आला नाही. त्यामुळे नाही आमदार बनला आणि नाही त्यांचे नगरसेवकांची संख्या वाढली गेली. त्यामुळे केवळ अस्तित्वापुरती एकमेव नगरसेवक उरला आहे. तर काँग्रेसच्या वतीने प्रमोद मांद्रेकर,शांतीलाल दोषी यांचेही वर्चस्व संपुष्टात आणले गेले. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणाला राजकीय समिकरणे बदलून टाकणारे लोढा यंदाच्या निवडणुकीत कोणती राजकीय समिकरणे वापरुन शिवसेनेला चेकमेट करतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

२०१२ च्या निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक

  • नोशीर रूसी मेहता-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • अरविंद देवजी दुधवडकर -शिवसेना
  • सरीता अजय पाटील (अध्यक्षा)- भाजपा
  •  अनिल सिंह-शिवसेना
  • ज्योत्स्ना देवेश मेहता- भाजपा
  • सुरेंद्र रामकृष्ण बागलकर-शिवसेना
  • शांतीलाल छोगालाल दोषी- काँग्रेस

 २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक

  •  सरीता अजय पाटील- भाजप
  • अरुंधती अरविंद दुधवडकर – शिवसेना
  • राजेंद्र दत्तात्रय नरवणकर- काँग्रेस
  • मिनल रुचित पटेल- भाजप
  • अनुराधा विजय पोतदार- भाजप
  • जोत्स्ना देवेश मेहता- भाजप
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.