कुख्यात गुंड छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला अटक

92
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास सहकारी छोटा शकील याचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने गुरुवारी, 4 आॅगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एनआयएने सलीम फ्रूट याला  चौकशीसाठी बोलावून सोडले होते. त्याच्या विरोधात पुरावे मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये एनआयए दाऊदच्या संबंधित २० ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले होते. छापेमारी दरम्यान एनआयएला काही महत्वाचे कागदपत्रे मिळाआली होती. या अनुषंगाने तपास सुरू होता, सलीम फ्रूट याला एनआयएने ताब्यात घेऊन सायंकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.

कोण आहे हा सलीम फ्रूट?

सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा सहकारी गुंड छोटा शकीलचा मेव्हणा आहे. दक्षिण मुंबईत फळे विकण्याचा त्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्याने सलीम फ्रूट या नावाने तो ओळखला जातो. छोटा शकील हा गुंड आणि कॉन्ट्रॅक्ट किंवा सुपारी किलर आहे जो त्याच्या टोळ्यांमार्फत खंडणीचे रॅकेट चालवत असे. छोटा शकील दाऊद इब्राहिमसाठी पाकिस्तानातून काम करत असल्याचा आरोप आहे.  सूत्रांचे म्हणणे आहे की, सलीम फ्रूटने पाकिस्तानातील छोटा शकीलच्या घरीही तीन ते चार वेळा भेट दिली होती.

सलीम फ्रूटवर असणारे गुन्हे..

२००० च्या सुरुवातीला परदेशात शकील आणि इब्राहिमसाठी खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आरोप फ्रूटवर होता आणि २००६  मध्ये दुबई सरकारने त्याला भारतात पाठवले होते. छोटा शकीलशी संबंधित खंडणी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, २०१० पर्यंत तो तुरुंगात होता. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सलीम फ्रुटला २००४ च्या एका गुन्हयात २०१६ मध्ये अटक केली होती. सलीम फ्रूटच्या साथीदारांनी मध्य मुंबईतील एका डॉक्टरला धमकावून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.