अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला १ वर्ष उलटून गेलं आहे. सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली होती. त्याकाळी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आली होती. यापैकी काही लोक खरोखर सुशांतचे चाहते होते तर काही लोक प्रसिद्धीसाठी बोलत होते. सुशांत सिंहने आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आला आहे असे आरोप अनेकांनी केले. इतकेच काय तर बडे नेते देखील या वादात उतरले.
हा तो काळ होता जेव्हा बॉलिवूडच्या विरोधात जणू एक आंदोलन उभे राहिले होते. नेपोटिझम, ड्रग्ज असे विषय चर्चेला आले. मात्र या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ शकला नाही. सुशांत सिंह राजपूतची खरोखर हत्या झाली असेल असे गृहित धरले तरी त्याला न्याय मिळेल की नाही हे आता सांगता येत नाही. हे प्रकरण बर्यापैकी शांत झालेले असताना आता सुशांतच्या जीवनावर एक चित्रपट आला आहे.
(हेही वाचा – ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे निर्माते असित मोदीसह तिघांवर गुन्हा दाखल)
या चित्रपटाचे नाव आहे “शशांक”. हा चित्रपट १४ जून रोजी हंगामा या ओटीटी मंचावर प्रदर्शित झाला असून लवकरच एमएक्स प्लेयर वर देखील प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सुशांतच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. आधी हा चित्रपट बायोपिक असल्याचे म्हटले गेले मात्र सुशांतच्या वडिलांनी आक्षेप नोंदवल्यामुळे चित्रपट सुशांतच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले गेले आहे. खरे खोटे हे चित्रपट पाहूनच कळू शकेल.
हा चित्रपट शशांक नावाच्या पात्राभोवती फिरतो. विशेष म्हणजे या चित्रपटात नेपोटिझम, ड्रग्ज इत्यादी विषय हाताळण्यात आले आहेत. ’द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटावरुन सध्या वाद सुरु आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक अनोज मिश्रा यांनी शशांक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामुळे नवा वाद निर्माण होईल? बॉलिवूड पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्यात उभा राहील? चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभेल? हे येणारा काळंच ठरवेल. मात्र अनेक निर्माते आणि दिग्दर्शक गंभीर विषयावर चित्रपट बनवत आहेत, ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community