कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढत असताना मुंबई आणि पुण्यासह ओमायक्रोनचा उपप्रकार असलेल्या बीए व्हेरिएंटने ठाण्यातही शिरकाव केला आहे. ठाण्यातील दोन जणांना बीए ५ ची बाधा झाली. इतर रुग्णांप्रमाणे ठाण्यातील या दोन्ही रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार देत बरे केले गेले.
मुंबईनंतर सर्वात जास्त रुग्णसंख्या ठाण्यात
ठाण्यातील एका २५ वर्षीय महिलेला आणि ३२ वर्षीय पुरुषाला बीए व्हेरिएंटची बाधा झाली होती. महिलेला २८ मे रोजी तर पुरुषाला ३० मे रोजी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांनीही कोरोनाची लस घेतली होती. मंगळवारी ठाणे ग्रामीण भागांत ३८ तर शहरांत २४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईनंतर सर्वात जास्त रुग्णसंख्या ठाण्यात आढळून येत आहे.
(हेही वाचा – मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेले देहू येथील शिळा मंदिर नेमके आहे तरी कसे?)
ठाण्यात आतापर्यंत ७ लाख ७३ हजार जणांना कोराना
ठाण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता एकूण रुग्णसंख्या ३ हजार ४०३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ठाण्यात आतापर्यंत ७ लाख ७३ हजार ६७४ जणांना कोरानाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५८ हजार ३५२ रुग्ण कोरोनावर उपचार मिळाल्यानंतर बरे झाले. ११ हजार ९१९ रुग्णांचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community