आता कोरोना डॉग स्क्वॉड, थायलँडमध्ये कुत्रे सेकंदात ओळखतात कोरोना रुग्ण!

कोरोनाची सध्या जगभरात कुठे दुसरी तर कुठे तिसरी लाट सुरु आहे, त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण शोधणे हे मोठे आव्हान असते, थायलँडने यात अफलातून उपाय शोधला आहे. 

84
कोरोनाची लक्षणे दिसल्यावर, आधी अँटीजन चाचणी करा, त्यात संशय आल्यावर आरटीपीसीआर टेस्ट करा, त्याचा रिपोर्ट यायला २४ तास लागणार, त्यानंतर संबंधित व्यक्ती ही कोरोना संक्रमित आहे कि नाही, हे सिद्ध होणार. आजवर जगभरात या पद्धतीला अजूनही कुणी बायपास केलेले नाही, परंतु याला थायलँड हा देश अपवाद ठरेल, कारण थायलँड कोणत्याही टेस्टच्या आधारे कोरोना रुग्ण शोधत नाही, तर कुत्र्यांच्या सहाय्याने वर्दळीच्या ठिकाणामधील कोरोनाचे रुग्ण शोधून काढत आहे.
New Project 1 14
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या घामाच्या नमुन्याचा वास घेताना प्रशिक्षित कुत्रा

थायलँडमधील विद्यापीठात संशोधन सुरू

  • थायलँडमधील चुलोलोंगकोर्न विद्यापीठात संशोधन सुरू आहे. 
  • मागील सहा महिन्यांपासून यावर सुरू संशोधन होत आहे.
  • त्यासाठी विशिष्ट कुत्र्यांना ट्रेनिंग दिले जात आहे.
  • हे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून, प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू झाला आहे.

(हेही वाचा : मुंबईत कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात २,३७७ रुग्ण)

काय करतात कुत्रे? 

  • प्रशिक्षित कुत्र्यांना कोरोनाबधित रुग्णाच्या घामाचा वास दिला जातो.
  • त्या आधारे ते कुत्रे एक – दोन सेकंदात कोरोना संक्रमण ओळखतात.
  • अशा प्रकारे या संशोधनाचे यश ९५ टक्के इतके आहे अर्थात कुत्रे ९५ टक्के बरोबर रुग्ण शोधतात.
  • रेल्वे, मेट्रो स्टेशन, विमानतळ अशा वर्दळीच्या आणि धावपळीच्या सार्वजनिक ठिकाणी हे कुत्रे काही सेकंदात कोरोना बाधित रुग्ण ओळखतात.
  • विशेष म्हणजे ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळून येत नाही, अशाही रुग्णांना हे कुत्रे शोधतात.
  • एका मिनिटात हे कुत्रे ६० नमुने तपासून कोरोना संसर्ग कुणाला झाला आहे, हे ओळखू शकतात.
  • हे कुत्रे जर कोरोना संक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात येणार असतील तर त्यांनाही त्याचा संसर्ग होवू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
  • मात्र कुत्र्यांना संसर्ग होत नसल्याचा एक मतप्रवाह आहे, तरीही थायलँडमध्ये यावरही संशोधन सुरू आहे.

चिली, फिनलँड आणि भारतातही सुरू आहे संशोधन

मागील महिन्यापासून चिली, फिनलँड आणि भारतातही या प्रकारचे संशोधन सुरू आहे. जगभरात सध्या कुठे कोरोनाची दुसरी, तर कुठे तिसरी लाट सुरू आहे, थायलँडमध्येही मागील २ महिन्यांपासून कोरोनची दुसरी लाट सुरू आहे, दोन महिन्यांत तेथे ८८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.