चंद्रपूरात वाघाचा बछडाही करतोय माणसावर हल्ला

158

चंद्रपूरातील कोलेरा गावात रामदास जग्ननाथ पिदूरकर या ६५ वर्षीय इसमावर वाघाने ह्लला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूरात शनिवारनंतर वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन जणांचा बळी गेला आहे. सलग दोन घटना पाहता दोन्ही भागांतील हल्लेखोर वाघांना जेरबंद केले जाईल, अशी माहिती चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्यवनसंरक्षक किशोर लोणकर यांनी दिली. यात एका बिबट्याच्या बछड्याचाही समावेश आहे.

नेमकी घटना काय?

२७ नोव्हेंबर रोजी गुरे चरायला घेऊन रामदास पिदूरकर कोलेरा गावालगतच्या जंगलात गेले होते. मात्र रात्री रामदास घरी परतले नाहीत. जंगलात वाघाचा वावर सुरु आहे, याची गावक-यांना कल्पना असल्याने त्यांनी तातडीने रामदास जंगलात गेल्यापासून परतले नसल्याची माहिती वनाधिका-यांना दिली. रात्री उशिरापर्यंत जंगलात वनाधिकारी रामदास यांचा शोध घेत होते. सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

( हेही वाचा: सर्वात मोठी हॅकींग: भारतासह 84 देशांतील WhatsApp Users चा डेटा लीक; खासगी माहितीची ऑनलाईन विक्री )

शनिवारची घटना 

नागभीड येथील पहारनी बिटातील जंगलाजवळील शेतात काम करणा-या महिलेवर बिबट्याच्या बछड्यांनी हल्ला करुन महिलेला ठार केले. ही घटना शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी घडली. याच बछड्यांनी काही दिवसांपूर्वी एका महिलेवरही हल्ला केल्याचे बोलले जात आहे. सध्या नागभीड येथील शेतात धान कापणीचे काम सुरु आहे. अशातच वाघाचे हल्ले वाढत असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची गांभीर्यता पाहता वनाधिका-यांनी शेतात कॅमेरे लावले असता या भागांत वाघाच्या एकाच बछड्याचा वावर दिसून आला. या बछड्यालाही वनाधिका-यांनी जेरबंद करण्याची तयारी दर्शवली आहे. या बछड्याचे अंदाजे वय वनाधिका-यांनी सांगितले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.