महिन्याला येणाऱ्या उत्पन्नाच्या स्रोतावरील कर कपात म्हणजेच टीडीएस कपातीचा नवा नियम हा १ जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे जास्त टीडीएस म्हणजेच कर भरावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही आता कोणाला, किंवा तुमच्या प्रियजनांना २० हजारांहून अधिक रुपयांचे गिफ्ट दिल्यास त्यावर कर आकारला जाऊ शकतो.
(हेही वाचा – शिंदे गटाला मोठा झटका! गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभूंची निवड)
केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यात एक नवीन कलम १९४ आर जोडण्यात आले आहे, ज्या अंतर्गत कोणत्याही व्यवसायात वर्षभरात २० हजार रुपये किया त्याहून अधिक भत्ते दिले गेले तर २० टक्के टीडीएस भरावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अशा सुविधा अतिरिक्त लाभांच्या कक्षेत येतात, मग ते रोख स्वरूपात मिळालेले असोत किंवा वस्तू स्वरूपात. या वस्तूंवर कर आकारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय असतील कर आकारणीचे नियम
अनेक प्रकारच्या व्यावसायिकांसाठी कर आकारणीचे नियम बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीडीएसचा नवा नियम त्या सर्व विक्रेत्यांना लागू होईल जे त्यांच्या डीलर किंवा ग्राहकांना टीव्ही, फ्रीज, कार, संगणक, सोन्याची नाणी इत्यादी भेटवस्तू किंवा इतर कोणत्याही प्रकारची भेट अथवा इन्सेटिव्ह देतात आणि विक्री वाढवतात. मात्र, उत्पादनांवरील सवलत आणि सवलतींवर कर आकारला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.