मुंबईकरांना आता प्रतीक्षा पावसाच्या आगमनाची परंतु…

राज्यात वेंगुर्ल्यात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसासह पूर्वमोसमी पावसाचे गुरुवार रात्री आगमन झाले. यामुळे मुंबईकरांना आता पावसाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. शुक्रवारी रात्रीही हलका पाऊस पडला, रात्री ९ नंतर मुंबईतील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याचे पहायला मिळाले, पुढील दोन दिवसात मान्सून वेगाने राज्यात पुढे सरकेल, अशी आशा वेधशाळेला असली तरीही मुंबईतील आगमनाची ११ जूनची तारीख वरुणराजा पाळेल, याबाबत साशंकता आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला )

पूर्वमोसमी पावसाला सायंकाळी सुरुवात होते. दिवसभर ढगाळ वातावरण दिसून राहत असेल तर नैऋत्यमोसमी वारे दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत राहते. आता मुंबईत ढगाळ वातावरच राहील, मेघगर्जनेसह हलका पाऊस राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत एका रात्रीच्या पावसाने किमान तापमानात चार अंशाने घट करत शुक्रवारी किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले. कमाल तापमानही ३४ अंशापर्यंत घसरले. सध्या कमाल आणि किमान तापमानात फारसा चढ उतार दिसून येणार नाही. परंतु दुपारी पावसाच्या सरींचा जोर वाढेपर्यंत निश्चितच घामाच्या धारा मुंबईकरांच्या सोबतीला राहतील.

वा-यांची दिशा आता नैऋत्येकडे बदलत असल्याने समुद्राहून वाहणारे बाष्पही आपल्याकडे येत आहे परिणामी, दुपारच्यावेळी तापमान वाढेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंत सरकार यांनी दिली.

मुंबईत पुढील दोन दिवसांसाठी हवामानाचा अंदाज

पुढील दोन दिवस कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसवर राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here