आता लालपरीचे कर्मचारी पुरवणार महाराष्ट्राला ‘ऑक्सिजन’! कसा? वाचा…

आजपासूनच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

90

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून आता आक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. त्यामुळे आता इतर राज्यांतून आक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हणाले अनिल परब

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचे कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. म्हणून हे टॅंकर्स आणण्यासाठी ड्रायव्हर्सचा कमी पडू लागले आहेत. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असे अनिल परब यांनी सांगितले. तसेच आजपासूनच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

(हेही वाचाः आधीच वेतनाची बोंब आता ​लसही मिळेना! राज्यात ‘लालपरी’ दुर्लक्षित)

‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीत कधी समावेश करणार?

आपले घरदार, गाव सोडून मुंबईत येऊन एसटीचे कर्मचारी सेवा देत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना देखील झाला होता. मात्र याची दखल ना सरकारने घेतली, ना एसटी प्रशासनाने. विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने घोषित केल्यानंतर ‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीत प्रत्यक्षात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पोलिस विभाग आणि महसूल विभागाचाही समावेश करण्यात आला. मात्र, या यादीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या सर्व संकटात पुढाकार घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा फ्रंट लाइन वॉरियरच्या यादीत कधी समावेश करणार, असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.