स्पाईसजेटच्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता हवाई तिकीट हप्त्यात भरता येणार

82

स्पाईसजेटच्या विमानाने तुम्ही जर विमान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर म्हणजे स्पाईसजेटच्या प्रवाशांना आता त्याच्या तिकिटाचे पैसे हप्त्यांमध्ये देता येणार आहे. विमान कंपनीने सोमवारी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे पैसे तीन, सहा किंवा बारा हप्त्यांमध्ये देता येणार आहे. स्पाईसजेटने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या योजने अंतर्गत ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तीन महिन्यांच्या ईएमआयच्या पर्यायाचा लाभ घेऊ शकणार आहे.

UPI ID वरून पहिला EMI भरणं आवश्यक

ईएमआय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा व्हीआयडी सारखे तपशील द्यावे लागतील आणि पासवर्डसह त्याची पडताळणी करावी लागेल. तसेच ग्राहकांना त्यांच्या UPI ID वरून पहिला EMI भरावा लागेल आणि त्यानंतरचा EMI त्याच UPI ID वरून कापला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ईएमआय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड तपशील देण्याची आवश्यकता नाही. टाटा सन्सकडे एअरलाईनचा नवीन मालक जाण्यापूर्वी आउटगोइंग मॅनेजमेंट कर्मचार्‍यांची थकबाकी योग्यरित्या सेटल केली जाईल, अशी आशा एअर इंडियाच्या पायलट युनियनपैकी एक असलेल्या इंडियन पायलट गिल्ड (IPG) ने व्यक्त केली आहे. एअर इंडियाच्या सीएमडीला लिहिलेल्या पत्रात, गिल्डने म्हटले आहे की, एअरलाइनच्या नवीन मालकांसह नवीन सुरुवात करण्याबद्दल ते आशावादी आहेत.

(हेही वाचा – व्हॉट्सअप, फेसबुकला मागे टाकत ‘हे’ बनलं जगातील नंबर-१ अॅप!)

असेही म्हटले पत्रात…

सध्या असेलेल्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे शोषण करू नये, असे आवाहनही या पत्रात करण्यात आले आहे. गिल्डने म्हटले की, शोषणामुळे मोठ्या प्रमाणात निषेध आणि औद्योगिक अशांतता निर्माण होऊ शकते. IPG नुसार, २००६ च्या वेतन सेटलमेंट अंतर्गत कॅप्टन आणि सह-वैमानिकांसाठी मासिक लेओव्हर निर्वाह भत्ता देण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत यातील २५ टक्के रक्कम अजूनही थकबाकी आहे. याशिवाय, गिल्डने असेही म्हटले, या वेतन करारांतर्गत ओव्हरटाईमचे पेमेंटही बऱ्याच काळापासून रोखून ठेवण्यात आले आहे. तसेच २०१२ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांवर चुकीच्या आणि एकतर्फी पद्धतीने २५ टक्के वेतन कपात करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.