आता महाराष्ट्रात होणार ‘सेमीकंडक्टर’ची निर्मिती

94

कोरोनापश्चात उद्योग क्षेत्राला बळकटी मिळत असताना, राज्यात आता सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशनची निर्मिती करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. त्यासाठी वेदांता कंपनीने गुंतवणुकीची तयारी दर्शविली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.

( हेही वाचा : गणपतीला रेल्वे गाड्या फुल्ल! असे बुक करा Confirm Tatkal तिकीट, जाणून घ्या प्रक्रिया)

वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ, हर्षदीप कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हा उद्योग राज्यात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्य प्राप्त करून दिले जाईल.त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होऊन राज्याच्या एकुण सकल उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

केवळ चार देशांत उत्पादन

यापूर्वी केवळ चार देशात असलेला हा उद्योग आपल्या राज्यात यावा, अशी इच्छा आहे. हा उद्योग राज्यासाठी महत्वाचा आहे. उद्योग उभारणीसाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी देण्यात आलेल्या वेळेचे (टाईम लाईन) पालन व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

असा असेल प्रकल्प

वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केली असून या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३ हजार ८०० कोटी रुपयांचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.