ह्रदयविकाराचा झटका आल्याने रक्तातील ट्रोपोनिनची पातळी वाढते. याची तपासणी केल्यावरच हार्ट अटॅकचे निदान होते. परंतु, आता रक्त तपासणीशिवाय याचे निदान करणारे घड्याळ नागपूरचे वरिष्ठ ह्रदयरोगतज्ज्ञ डाॅक्टर शंतनू सेनगुप्ता यांनी तयार केले आहे. 230 रुग्णांवर त्याचे यशस्वी प्रयोग करुन नुकतेच त्यांनी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत याचे सादरीकरणही केले.
ट्रोपोनिनसाठी सध्या रक्त तपासणी हाच पर्याय आहे. मात्र, त्यात वेळ जातो. डाॅक्टर सेनगुप्ता यांनी संशोधन करुन एक उपकरण अमेरिकेतील एका फर्मकडून बनवून घेतले. या उपकरणाची चाचणी वर्षभर पाच मोठ्या दवाखान्यांमध्ये सुरु होती. रक्त तपासणी आणि या उपकरणाच्या माध्यामातून केलेली तपासणी यांचे निकाल 98 टक्के जुळले.
( हेही वाचा: राज्यात उष्णतेची लाट; उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा, ‘हे’ करु नका, जाणून घ्या सविस्तर )
दुखण्याकडे दुर्लक्ष करणा-यांसाठी वरदान
अनेक लोक ह्रदयाची जळजळ, छातीत दुखणे ही अॅसिडिटी किंवा गॅसेसची लक्षणे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, जिवाचा धोका निर्माण होतो, परंतु या उपकरणामुळे ट्रोपोनिनचे अचूक निदान होऊन ते वाचताही येत असल्याने तातडीने उपचार घेणे शक्य होतील, असेही डाॅक्टर श्रीवास्तव म्हणाले.
अमेरिका, युरोपमध्ये घडाळ्याचे स्वागत
प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांना अनुसरुन उपकरणाची स्टेज फोर चाचणी यशस्वी झाली की, याचे व्यावसायिक उत्पादन सुरु होईल, असेही डाॅक्टर सेनगुप्ता म्हणाले.
ही चाचणी मध्य भारतातील 230 हून अधिक रुग्णांवर करण्यात आली. डाॅक्टर सेनगुप्ता यांच्यासह डाॅक्टर महेश फुलवानी, डाॅक्टर अजीज खान, डाॅक्टर हर्षवर्धन मार्डीकर व रायपूरचे डाॅक्टर स्मित श्रीवास्तव या ह्रदयरोगतज्ज्ञांनी चाचण्या घेतल्या.