समुद्रकिना-यावर दारु पिणे पडणार महागात; भरावा लागणार 50 हजारापर्यंतचा दंड

149

गोव्याला जाऊन एन्जाॅय करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आता गोव्यात समुद्रकिनारी दारु पिणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला 50 हजार रुपयापर्यंतचा भूर्दंडही बसू शकतो. गोवा सरकारने नियमात बदल केल्याने अशा वर्तणुकीचा तुमच्यासह मित्रांनाही मनस्ताप होऊ शकतो.

गोवा सरकारने समुद्र किना-यांवरील स्वच्छतेसाठी कठोर नियमांची घोषणा केली आहे. त्यानुसार, या नियमांचे उल्लंघन करणा-या पर्यटकांना आर्थिक दंड ठोठावला जाईल. गोवा पोलिसांची समुद्र किना-यावरील गस्त आणखी कडक करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपासून गोव्याचा समुद्र किना-यावर वाहन चालवणे आणि स्वयंपाक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी दोषी व्यक्तींवर कडक कारवाई गोवा पोलीस करणार आहेत. त्यासाठी दक्षता पथकही असतील.

( हेही वाचा: Virat Kohli Birthday : विराट कोहली आणि 18 क्रमांकाचे आहे भावनिक कनेक्शन! )

…..तर दंड भरावा लागणार 

एवढेच नाही तर एखादी व्यक्ती किना-यावर दारु पिताना आणि बाटल्या फोडताना आढळली आणि कचरा करताना सापडली तर अशा व्यक्ती किंवा ग्रुपवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. हा नियम केवळ पर्यटकांना लागू असेल असे नाही. तर समुद्र किना-यावर जेवण, दारुचा पुरवठा करणारे हाॅटेल्स, रेस्टाॅरंट आणि इतर सेवा पुरवठादारांवरही हे नियम लागू असतील. वाॅटर स्पोर्टस हे ठराविक ठिकाणी सुरु असतील. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना आर्थिक दंड लावण्यात येईल. अशा व्यक्तींना, ग्रुपला, आयोजकांना 5 हजार ते 50 हजार अथवा नियमानुसार, जे योग्य असेल ती रक्कम दंड म्हणून जमा करावी लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.