आधारकार्ड ही काळाची गरज बनत चालली आहे. दैनंदिन व्यवहारात आधारकार्डला विशेष महत्व आहे. मात्र हे आधारकार्ड मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळ खाऊ प्रक्रियेमुळे आजही अनेक नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी जात नाहीत. मात्र ही अडचण आता दूर झाली असून राज्यातील सर्वाधिक मोठे आधारकार्ड केंद्र हे ठाण्यात उभारण्यात आले असून या आधारकार्ड केंद्रात अवघ्या १० मिनिटात आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ठाण्याच्या लेकसिटी मॉलमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रात दररोज ३०० पेक्षा अधिक नागरिक या केंद्राचा लाभ घेत आहेत.
(हेही वाचा – राजधानी एक्सप्रेसनं गाठली वयाची ‘हाफ सँच्युरी’!)
भारतात ७६ तर, महाराष्ट्रात ८ ठिकाणी केंद्र
केंद्र शासनाने आधारकार्ड या योजनेला विशेष महत्व दिले आहे. त्यानुसार भारतात ७६ तर, महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, पुणे धुळे आणि ठाणे आदी आठ ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये ठाण्यातील लेक सिटी मॉलमध्ये उभारण्यात आलले केंद्र हे राज्यातील सर्वात मोठे केंद्र आहे. या ठिकाणी आधारकार्ड काढण्याची पद्धत सोपी व सूटसुटीत असून यासाठी इतर आधारकेंद्रा प्रमाणे वेळ खर्ची करावा लागत नसून अवघ्या १० मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होवून नवीन आधारकार्ड काढण्यासाठी अथवा आधारकार्ड मधील काही दुरुस्त्या करण्यासाठी आलेली व्यति केंद्राच्या बाहेर पडत आहे. या ठिकाणी १६ काउंटरच्या माध्यामातून ही प्रक्रिया पार पाडण्यात येते. त्यात सध्याच्या घडीला या केंद्राच्या माध्यामतून २०० ते २५० आधारकार्ड काढण्याच्या व दुरुस्तीच्या प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर, या ठिकाणी प्रतिदिन एक हजार आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे.
(हेही वाचा – तुम्ही कोणाला ‘टकल्या’ म्हणून चिडवताय? तर सावधान! कारण…)
आधार केंद्र आपल्या दारी
कापुरबावडी येथे उभारण्यात आलेल्या या आधारकार्ड केंद्राला आमदार संजय केळकर यांनी भेट देवून तेथील प्रक्रिया समजावून घेतली. यावेळी केंद्र सरकारचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड काढावे लागते, ठाणेकर नागरिकांसह जिल्हावासीयांसाठी राज्यातील सर्वात मोठे केंद्र ठाण्यात उभारण्यात आले आहे. या आधार केंद्रामध्ये एक हजार नागरिकांच्या आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया १० मिनिटात पूर्ण करता येत आहे. त्यामुळे आधार केंद्र आपल्या दारी अशी भूमिका केंद्र सरकारची आहे. दर पाच वर्षांनी आपले आधारकार्ड नुतनीकरण करावे लागणार असल्याचे सांगत, जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले.
Join Our WhatsApp Community