NPS Payments Using UPI : आता एनपीएसमधील गुंतवणूक थेट क्यू आर कोड स्कॅन करून करता येणार 

एनपीएस खात्यासाठीचे क्युआर कोड ऑफलाईन सेव्ह करता येणार आहेत 

252
ICICI Bank: अनिवासी भारतीयांना आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांद्वारे UPI पेमेंट करता येणार, 'या' १० देशांमध्ये खास सुविधा
ICICI Bank: अनिवासी भारतीयांना आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांद्वारे UPI पेमेंट करता येणार, 'या' १० देशांमध्ये खास सुविधा

ऋजुता लुकतुके

नॅशनल पेन्शन (NPS Payments Using UPI) सिस्टिममध्ये तुमच्या खात्यात पैसे भरण्यासाठी आता क्युआर कोड स्कॅन करता येणार आहे. म्हणजेच युपीआयच्या माध्यमातूनही ग्राहक आता एनपीएस खात्यात गुंतवणूक करू शकतील. यासाठी कुठलंही युपीआय ॲप चालण्यासारखं आहे.

प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील खात्यांसाठी सध्या ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  हा क्युआर कोड ग्राहकांना पुढे वापरासाठी सेव्हही करून ठेवता येणार आहे.

एनपीएस खातं सुरू केल्यानंतर अलीकडे ऑनलाईन पद्धतीनेही यात पैसे भरता येतात. आतापर्यंत १० लाखांच्या वर ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने पैसे भरले आहेत. तर ऑनलाईन सुविधा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत २७०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.

(हेही वाचा-Sanjay Raut : संजय राऊतांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना त्यांची ‘जागा’ दाखवली )

आता ऑनलाईन पद्धतीत आणखी एक म्हणजे युपीआयचा पर्याय जोडला गेला आहे. एनपीएसच्या (NPS Payments Using UPI) प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र क्युआर कोड करण्यात येईल. आणि तो स्कॅन करून ग्राहक पैसे भरू शकतात. एकच क्युआर कोड पुढील गुंतवणुकीसाठीही वापरता येईल.

त्यामुळे युपीआय पेमेंट सुरक्षितही असेल. आतापर्यंत ऑनलाईन पैसे भरण्यासाठी फक्त बँक खात्यातून पैसे हस्तांतरण करण्याचा पर्याय होता. ऑनलाईन पेमेंटसाठी ग्राहकाला डि रिमिट आयडी दिला जायचा. आणि तो १५ आकड्यांचा क्रमांक वापरून ग्राहकांना बँक खात्यातून पैसे वळते करता येत होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.