शनिवारी राज्यातील कोरोनाची संख्या ९९८ पर्यंत पोहोचली. राज्याच्या एकूण कोरोनाच्या संख्येपैकी ५५ टक्के कोरोना रुग्णांचा भार पुन्हा मुंबईवर आला आहे. मुंबईत सध्या ६०९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल पुण्यात २२३ कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे.
डिस्चार्ज रुग्णांची संख्या शंभरीवर
लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्यात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाण्यात ८५, नाशिक, अहमदनगरमध्ये प्रत्येकी १० रुग्णांवर कोरोनावर उपचार दिले जात आहे. राज्यात दर दिवसांच्या नोंदीत नव्या रुग्णांची तसेच दर दिवसाला डिस्चार्ज रुग्णांची संख्या शंभरीवर नोंदवली जात आहे.
(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दुसऱ्या दिवशीही दिलासा नाही, आता फैसला सोमवारी)
आरोग्य विभागाने दिला हा सल्ला
शनिवारी नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १५५ वर नोंदवली गेली. तर १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत एकाचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ओमायक्रॉनची तिसरी लाट संपण्यल्यापासून सतत ९८.११ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. मृत्यूदरही आटोक्यात असल्याने आरोग्य विभागाने लसीकरण पूर्ण करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.