पुण्यात कोरोनाचा कहर

परदेशवारी करुन परतलेल्या ३७ वर्षीय पुण्यातील तरुणाच्या शरीरात बी.ए.५ विषाणू आढळून आला. या रुग्णाने नुकताच इंग्लंड दौरा केला होता. पुण्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या बी.ए.५ विषाणूची ६जणांना बाधा झाली आहे.

ओमायक्रॉन उपप्रकार 

या अगोदरच्या बाधित रुग्णांप्रमाणे ३७ वर्षीय रुग्णालाही घरगुती विलगीकरणात औषधोपचार देत बरे केले गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. २१ मे रोजी इंग्लंडहून परतल्यानंतर २ जूनला त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाने तरुणाच्या जनुकीय अहवालात बी.ए.५ उपप्रकार सापडल्याचे आरोग्य विभागाला कळवले. अखेर तो उपचारानंतर बरा झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

( हेही वाचा : मुंबईकरांनो, हातचे राखत पाणी वापरा;एवढ्याच दिवसाचे आहे तलावांमध्ये पाणी)

राज्यात शनिवारी २ हजार ९२२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १ हजार ३९२ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के नोंदवले गेले. आता राज्यातील विविध भागांत तब्बल १४ हजार ८५८ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. त्यापैकी १० हजार ४७ रुग्णांना मुंबईत उपचार दिले जात आहेत. पुण्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्याही १ हजार १८ वर पोहोचली आहे. ठाण्यातही २ हजार ४६० कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here