खासगीकरणाच्या निर्णयाला परिचारिका व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध!

98

संपूर्ण जगावर २०१९मध्ये कोरोनाचे संकट आले. या महामारीत जगभरात प्रचंड जीवितहानी झाली, याला महाराष्ट्रही अपवाद नव्हता. जगभरातील परिचारिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता या युद्धात स्वतःला झोकून दिले. गेली कित्येक वर्ष लेखी व तोंडी आश्वासने देऊनही अद्याप परिचारिका पदभरती झालेली नाही. १३ एप्रिल, २०२२ ला शासनाने परिपत्रक जारी करत बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मात्र आता याला परिचारिकांकडून विरोध केला जात आहे.

( हेही वाचा : सिम कार्डची एक बाजू कट केलेली का असते? जाणून घ्या… )

खाजगीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी जे. जे. रुग्णालयातील सर्व संवर्गातील संघटनांनी (कृती समितीच्या माध्यमातून) दिनांक २९ एप्रिल रोजी दुपारी २.०० वाजता गेट मिटींग आयोजित केली होती. यावेळी खासगीकरणाच्या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कोरोनाच्या काळात नियमित सेवेत रूजू असलेल्या कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली हीच परिस्थिती भविष्यात उद्भवली तर कंत्राटी कर्मचारी त्याच निष्ठेने काम करतील का असा सवाल कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे. हे कंत्राटीकरण बंद झाले पाहिजे या कंत्राटी भरतीमुळे आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असेही संघटनांनी सांगितले.

रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात यावीत

शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये तसेच संलग्नित रुग्णालयातील ४ हजार ४४५ पदांवरील सेवा भरती बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) भरण्यास शासनाने १३ एप्रिल रोजी परिपत्रक जारी करत मान्यता दिली. या बाह्य स्त्रोताद्वारे भरती करण्याच्या निर्णयाला परिचारिका वर्गाने तीव्र विरोध केला आहे. ही रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात यावीत अशी मागणी परिचारिकांमार्फत करण्यात येत आहे.

New Project 4 22

परिचारिकांवर होणारा अन्याय दूर करावा

बाह्यस्रोत पद्धतीने परिचारिकांची ही पदे भरण्याचा शासनाने जो निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो शासनाला आमची नम्र विनंती आहे की, त्यांनी परिचारिका वर्गांची भरती ही सरळ सेवेमार्फत करावी. आमच्या जागा लवकरात लवकर सरळसेवेने भरण्यात याव्यात आणि आमच्यावर होणारा हा अन्याय दूर करावा असे मत राज्य परिचारिका संघटनेच्या हेमलता गजबे यांनी व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.