अन्यथा धरणे आंदोलन करू; जीटी रुग्णालयातील द्वारसभेत परिचारिका संघटनेचा इशारा!

93

शासनाने बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास मान्यता दिली असून यास परिचारिकांकडून विरोध होत आहे. परिचारिकांना या निर्णयातून वगळण्याची विनंती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारला केली आहे. तसेच राज्यातील परिचारिकांच्या अनेक मागण्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी शासनाने चर्चेस वेळ द्यावा अन्यथा २३, २४ व २५ मे २०२२ रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारला गोकुलदास तेजपाल रुग्णालय मुंबई येथे झालेल्या द्वार सभेच्या माध्यमातून दिला. यावेळी हेमलता गजबे, विशाल गंगावणे, किरण, आशिष, सौरभ, स्मिता, राजन व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

( हेही वाचा : जे.जे.रुग्णालयात द्वारसभा; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन)

असे आहे आंदोलनाचे स्वरूप

दिनांक २३, २४, २५ मे २०२२ पासून मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन व सर्व जिल्ह्यात १ तास काम बंद आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहे. दिनांक २६ व २७ मे २०२२ रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर २८ मे २०२२ पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या जे.जे.रुग्णालय शाखेच्या परिचारिका सुद्धा सहभागी होणार आहेत.

रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो, तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील. असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.