मुंबईत कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-यांनी संप पुकारण्यास सुरुवात केली आहे. कंत्राटीकरणाविरोधात राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील परिचारिका बेमुदत संपावर असताना आता मुंबईतील आरोग्य सेविकांनीही बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. १ जूनपासून मुंबईतील ४ हजार आरोग्यसेविका आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन व कामगाराचा दर्जा या आरोग्यसेविकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
( हेही वाचा : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा गुरूवारी बंद!)
कोरोनाकाळात आरोग्यसेविकांनी मुंबईतील प्रत्येक घराघरांत जाऊन कोरोना रुग्णांची माहिती, मुंबईतील प्रत्येक घरातील रुग्णांचे आजार, तसेच कोरोना तपासणीनंतर रुग्णांना केंद्रात पोहोचवणे ते घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषधे देण्यापासून सर्व कामे केली आहेत. आरोग्य सेविकांच्या सततच्या प्रयत्नांमुळेच कोरोना नियंत्रणाचे श्रेय मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना मिळाले. मात्र कोरोनानंतर पालिकेला आरोग्यसेविकांच्या प्रश्नांचा पुन्हा विसर पडला, या शब्दांत महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी टीका केली.
आरोग्यसेविकांच्या मागण्या
– २०१५ सालापासून किमान वेतन थकबाकीसह द्यावे.
– २०११ पासून भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा फायदा द्यावा.
– निवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना उपदनाची रक्कम द्यावी.
– २००० सालापासून दरमहा सहाशे रुपये वाहतूक भत्ता द्यावा.
– प्रसूती रजा द्यावी.
सकारात्मक बैठका परंतु कार्यवाही शून्य…
Join Our WhatsApp Communityआमच्या मागण्यांवर न्यायलीन लढा जिंकूनही पालिका प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. १४ मे नंतर आज पालिका प्रशासनासोबत आमची बैठक झाली. आम्ही तुमच्या मागण्यांवर सकारात्मक आहोत, या शब्दांपुढे जात प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही, त्यामुळे १ जूनपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत.
– अॅड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, मुंबई