कंत्राटी पदे भरण्यास परिचारिकांचा विरोध

सन २०१९ मध्ये जगभरात कोविड १९ या महामारीच्या स्वरुपात जागतिक संकट जगावर ओढवले, या महामारीत जगभरात प्रचंड जीवितहानी झाली, याला महाराष्ट्र अपवाद नव्हता, जगभरातील परिचारिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता या युद्धात स्वतःला झोकून दिले. गेली कित्येक वर्ष लेखी व तोंडी आश्वासने देऊनही अद्याप परिचारिका पदभरती झालेली नव्हती. यासंदर्भात परिचारिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सुद्धा दिले होते. मात्र आता शासनाने बाहयस्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास मान्यता दिली असून यास परिचारिका वर्गाकडून विरोध होत आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक! परशुराम घाट २५ मे पर्यंत बंद )

रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात यावीत

शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालये तसेच संलग्नित रुग्णालयातील ४ हजार ४४५ पदांवरील सेवा भरती बाहयस्त्रोताद्वारे (कंत्राटी) भरण्यास शासनाने १३ एप्रिल रोजी परिपत्रक जारी करत मान्यता दिली. या बाहयस्त्रोताद्वारे भरती करण्याच्या निर्णयाला परिचारिका वर्गाने तीव्र विरोध केला आहे. ही रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात यावीत अशी मागणी परिचारिकांमार्फत करण्यात येत आहे.

परिचारिकांवर होणारा हा अन्याय दूर

बाह्यस्रोत पद्धतीने परिचारिका ही पदे भरण्याचा शासनाचा जो निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो शासनाला आमची नम्र विनंती आहे की, त्यांनी परिचारिका वर्गांची भरती ही सरळ सेवेमार्फत घ्यावी. आमच्या जागा लवकरात लवकर सरळसेवेने भरण्यात याव्यात आणि आमच्यावर होणारा हा अन्याय दूर करावा असे मत राज्य परिचारिका संघटनेच्या हेमलता गजबे यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here