प्रभाग रचनेबाबत अगदी शेवटच्या दिवशी मुंबईकरांनी अशी दाखवली चमक! किती दाखल केल्या हरकती व सूचना?

102

मुंबई महापालिकेचे २३६ प्रभागांसाठी मागवण्यात आलेल्या हरकती व सूचनांच्या संदर्भात शेवटच्या दिवशी अर्थात १४ फेब्रुवारी रोजी अगदी हरकती व सूचनांचा पाऊसच पडला. एकाच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ४५४ हरकती व सूचना २४ विभागीय कार्यालयांमधील करनिर्धारण व संकलन अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहे. प्रभागाच्या रचना प्रसिध्द केल्यानंतर १ ते १३ फेब्रुवारी या कालावधीमध्ये केवळ ३५८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातुलनेत सोमवारी एकाच दिवशी ४५४ हरकती व सूचना प्राप्त होऊन एकूण ८१२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

२३६ प्रभाग बनवून याचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांऐवजी २३६ प्रभाग बनवण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतल्यानंतर याला आयोगानेही मंजूरी दिली. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने २३६ प्रभाग बनवून याचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यांनी २३६ प्रभागांच्या रचनेबाबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हरकती व सूचना नोंदवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी प्रभागांच्या रचना प्रसिध्द करून १४ फेब्रुवारीपर्यंत याबाबत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले होते.

( हेही वाचा : काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडायला ‘हे’ ठरु शकते कारण? )

त्यानुसार, १ ते १३ फेब्रुवारीपर्यंत ३५८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या, तर १४ फेब्रुवारी रोजी ४५४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. यामध्ये शहर भागामध्ये ७६, पश्चिम उपनगरे ३३९ आणि पूर्व उपनगरांमध्ये २६३ तसेच निवडणूक मुख्य कार्यालयामध्ये १३४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

शेवटच्या दिवशी ४५४ तक्रारी नोंदवल्या

विशेष म्हणजे पहिल्या १३ दिवसांमध्ये हरकती व सूचना नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांनी अगदी शेवटच्या दिवशी ४५४ तक्रारी नोंदवल्या. यामध्ये कोणत्याही प्रभागांमधील हरकतींबाबत किंवा सूचनांची माहिती प्रतिस्पर्ध्यांना होऊ नये याची अधिक काळजी राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे पहिल्या १३ दिवसांमध्ये जेवढा प्रतिसाद लाभला नाही त्याच्या दीडपटीने प्रतिसाद हा एका दिवसांमध्ये लाभल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ए विभागात एकही हरकती व सूचना नोंदवली गेली नाही. गोरेगाव आणि डोंगरी, उमरखाडी परिसरात प्रत्येकी दोन हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

ज्या प्रशासकीय कार्यालयांच्या हद्दीत प्रभागांची वाढ झाली, तेथे किती तक्रारी

शहर

  • ई विभाग : ६
  • एफ दक्षिण : २६
  • जी दक्षिण : १०

पश्चिम उपनगरे

  • एच पूर्व : १३
  • आर दक्षिण : ७६
  • आर मध्य व उत्तर : ७६

पूर्व उपनगरे

  • एल विभाग : ६३
  • एम पश्चिम : १८
  • एन विभाग : ७९

कशाप्रकारे प्राप्त झाल्या हरकती सूचना

  • शहर विभाग : ७६
  • पश्चिम उपनगरे : ३३९
  • पूर्व उपनगरे : २६३
  • मु. निवडणूक कार्यालय: १३२

सर्वात जास्त हरकती व सूचना आलेले प्रभाग कार्यालये

  • के पूर्व : ८५
  • एम पूर्व : ८४
  • एन विभाग : ७९
  • आर दक्षिण :७६
  • एल विभाग : ६३
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.