ओडिसी साहित्यात नवा प्रवाह निर्माण करणारे ओडिसी कादंबरीकार Kalindi Charan Panigrahi

कालिंदी चरण पाणिग्रही यांचा जन्म २ जुलै १९०१ साली ओडिसा इथल्या पुरी जिल्ह्यातल्या विश्वासपूर येथे झाला.

178
ओडिसी साहित्यात नवा प्रवाह निर्माण करणारे ओडिसी कादंबरीकार Kalindi Charan Panigrahi
ओडिसी साहित्यात नवा प्रवाह निर्माण करणारे ओडिसी कादंबरीकार Kalindi Charan Panigrahi

कालिंदी चरण पाणिग्रही (Kalindi Charan Panigrahi) हे एक प्रसिद्ध ओडिसी कवी, कादंबरीकार, कथा लेखक, नाटककार आणि निबंधकार होते. त्यांची ‘मग्नम ओपुस मतिरा मनीषा’ नावाची कलाकृती प्रसिद्ध आहे. ओडिसी भाषेतल्या साहित्यातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ आणि ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

कालिंदी चरण पाणिग्रही (Kalindi Charan Panigrahi) यांचा जन्म २ जुलै १९०१ साली ओडिसा इथल्या पुरी जिल्ह्यातल्या विश्वासपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव स्वप्नेश्वर पाणिग्रही असं होतं. ते वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या आईचं नाव सरस्वती पाणिग्रही असं होतं.

(हेही वाचा – हिंदी, पंजाबी आणि तेलगू चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते Pavan Malhotra)

कालिंदी चरण पाणिग्रही (Kalindi Charan Panigrahi) यांनी पुरी जिल्ह्यातल्या शाळेत आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. मग हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कटक इथल्या रेव्हनशॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी आपल्या लेखनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक ‘नॉनसेन्स’ नावाचा क्लब स्थापन केला होता. या क्लबमधल्या त्यांच्या इतर लेखक मित्रांसोबत त्यांनी ‘अबकाश’ नावाचं एक हस्तलिखित मासिक प्रकाशित केलं. नंतर या मासिकाचं नाव बदलून ‘शक्ती साधना’ असं ठेवण्यात आलं.

(हेही वाचा – एमएमआरडीए हद्दीतील सर्व होर्डिंगचे एका महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिट; Minister Uday Samant यांची घोषणा)

कालिंदी चरण पाणिग्रही (Kalindi Charan Panigrahi) यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा पुष्कळ प्रभाव होता. ‘सबुजा’ हा शब्द प्रमथा चौधरी यांनी प्रकाशित केलेल्या ‘सबुजपत्र’ या बंगाली मासिकाच्या नावावरून घेतलेला आहे. त्यामुळे ओडिसी साहित्यात काही काळापूरतीच का असेना पण ‘साबुजा जुगा’ नावाची एक प्रभावशाली चळवळ सुरू झाली.

या चळवळीच्या काळात कालिंदी चरण पाणिग्रही त्यांनी ‘सबुजा कविता’ साठी सात कविता लिहिल्या. त्यांपैकी ‘छुरितिये लोडा’, ‘मो कविता’, ‘क्ष्यनिका सत्य’ या कविता प्रसिद्ध आहेत. सबुजा चळवळीने नंतर प्रगती युग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरोगामी चळवळीला मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर कालिंदी चरण पाणिग्रही यांनी त्यांची प्रसिद्ध ‘मतिरा मनीषा’ नावाची कादंबरी लिहिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.