ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सची स्कूटर आली बाजारात

196

ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकातर्फे ओडिसी ट्रॉट या बी2बी इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणली आहे. या दुचाकीची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. ही अत्यंत टिकाऊ भक्कम बाइक आहे. या बाइकची लोडिंग क्षमता 250 किलो आहे. या वाहनाचे सरासरी मायलेज 75 किमी आहे आणि ही आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) कनेक्टेड असल्याने हे वाहन ट्रॅक करणे, गाडी बंद करणे, जिओ-फेन्सिंग आणि इतर आधुनिक फीचर्स या बाइकमध्ये आहेत.

ट्रॉटमध्ये 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. या वाहनाचा कमाल वेग 25 किमी/प्रति तास इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पुढील बाजूस ड्रम ब्रेक आहे आणि मागील बाजूस डिस्क-ब्रेक आहे. चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने या वाहनात 60V 32Ah क्षमतेची काढता येणारी (डिटॅचेबल) वॉटरप्रूफ बॅटरी लावलेली आहे. ही बॅटरी 2 तासांत 60% चार्ज होते आणि संपूर्ण चार्ज व्हायला 4 तास लागतात. एका चार्जमध्ये ही गाडी 75 किमी अंतर जाते. 60V32AH IP67 बॅटरी पॅकमुळे अतुलनीय टिकाऊपणा प्राप्त होतो आणि बी2बी वापरासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरते.

(हेही वाचा पंतप्रधानांचे ‘ते’ वक्तव्य खोटे ठरवण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न; FACT CHECK मधून पर्दाफाश)

ट्रॉटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स आहेत. डिलिव्हरी क्षेत्राच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी ते कस्टमाइझ करता येऊ शकतात. गॅस सिलिंडर, अवजड हार्डवेअर उपकरणे, पाण्याची पिंपे या सर्वांपासून ते किराणा सामान, औषधे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत ही उत्पादने अखंडितपणे व सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी ओडिसीतर्फे अतिरिक्त कस्टमाइझ्ड अॅक्सेसरी उपलब्ध करून देण्यात येतात. इलेक्ट्रिक स्कूटर चार रंगांमध्ये उपलब्ध आहे, पिवळा, काळा, लाल आणि मरून. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये ट्रेंडी लुक्स आणि भक्कम बांधणीची सांगड घालण्यात आली आहे. रायडरसाठी आरामदायीपणाची खातरजमा करण्यासाठी ट्रॉटमध्ये स्मार्ट बीएमएस, IoT ट्रॅकिंग डिव्हाइस, एलडी ओडोमीटर इत्यादी फीचर्स समाविष्ट केले आहेत.

या प्रसंगी ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रा. लि.चे सीईओ नेमिन व्होरा म्हणाले, “कोव्हिड-19 महामारीने ई-कॉमर्स आणि लास्ट माइल डिलिव्हरी (घरपोच डिलिव्हरी) या दोन क्षेत्रांच्या वाढीला चालना दिली. सातत्याने नवीन प्रयोग करणे, संचलनाचा खर्च करणे आणि कार्यक्षमता वाढविणे याला डिलिव्हरी सेगमेंटमधील व्यवसायांकडून प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे हा पर्यावरणस्नेही बदल आहे जो लोकांना व कंपन्यांना स्वीकारायचा आहे. या स्कूटरच्या निमित्ताने आम्ही बी2बी सेगमेंटमध्ये पदार्पण केले असून ही अशा प्रकारची एकमेव स्कूटर असून ती मार्केटमध्ये उलथापालथ घडवून आणणार आहे. ट्रॉटसारखी अमूलाग्र बदल घडविणारी प्रोडक्ट्स सादर करून या प्रगतीपथावर असलेल्या क्षेत्राचा पूर्ण लाभ घेण्यास आणि या सेगमेंटसाठी नवे मापदंड तयार करण्यास सज्ज आहोत. या इलेक्ट्रिक स्कूटरतर्फे बॅटरीवर 3 वर्षांची आणि पॉवर ट्रेनवर 1 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. भारतभरातील ओडिसी डीलर्स आणि स्टोअर्सकडून ट्रॉट खरेदी करता येऊ शकते.

ओडिसी हा मुंबई स्थापन झालेला इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट अप असून व्होरा कंपनी समुहाचा हा एक भाग आहे. या पूर्णपणे-इलेक्ट्रिक वाहतूक प्लॅटफॉर्म असून यात जगभरातील आघाडीच्या ई. व्ही. कंपोनंट उत्पादकांची आणि तंत्रज्ञांची सांगड घालण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांसाठी इंटेलिजंट नागरी इलेक्ट्रिक वाहतुकीच्या नव्या युगाची ओळख करून देता येईल. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, फॅशनेबल खरेदीदारांपासून ते आरामदायी प्रवास करू इच्छिणारे आणि व्यस्त बिझनेस रायडर्सपर्यंत सर्वांसाठी कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रोडक्टची टिकाऊपणाची व अवलंबित्वाची काटेकोर चाचणी करण्यात आली आहे. ओडिसी प्रत्येक कस्टमरला दर्जा, आरामदायीपणा, स्टाइल हे सर्वसमावेशक पॅकेज वाजवी किमतीत उपलब्ध करून देते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.