ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर मार्ग ठप्प

सायंकाळी ७.१५ पासून ठाणे ते वाशी मार्ग बंद आहे. वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्ग ठप्प झाला आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या मिनी बसेसकडे प्रवाशांची पाठ… कारण काय वाचा!)

ट्रान्सहार्बर मार्ग ठप्प

मात्र, ठाणे – पनवेल आणि ठाणे जुईनगर हा मार्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना वाशीला जायचे असेल तर त्यांना जुईनगरला उतरून जावे लागणार आहे. रेल्वे अधिकारी/ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून लवकरात लवकर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here