तेल माफियाचा कोविडमुळे मृत्यू …

100

मोहम्मद अली या मुंबईतील सर्वात मोठ्या तेल माफियाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळील व्यक्तींपैकी मोहम्मद अली हा एक होता. कुर्ला येथील फोजिया रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, या उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहे मोहम्मद अली?

मूळचा अलाहाबाद येथील मोहम्मद अली १९६० मध्ये घरच्यांसोबत भांडण करुन मुंबईत आला होता. मुंबईत तो आपल्या काकाकडे राहत होता. मुंबई गोदीच्या बाहेर असलेल्या काकाच्या सायकल दुकानावर मोहम्मद अली काम करत होता. सायकलचे पंक्चर काढता काढता, त्याची ओळख गोदीमध्ये काम करणाऱ्या अधिका-यांसोबत झाली.
या ओळखीतून तो गोदीतून सामान बाहेर काढून, ते सायकलवरुन शुक्लाजी स्ट्रीट येथे आणून विकत होता. हळूहळू तो बाहेरच्या देशातून येणाऱ्या जहाजांतून तेल चोरणा-या टोळीत सामील झाला व आपल्या ओळखीच्या जोरावर त्याने जहाजातून तेल काढून त्याची तस्करी करायला सुरुवात केली. बघता बघता तो सर्वात मोठा तेल माफिया झाला. या काळात मुंबईत असलेल्या गुंड टोळ्यांपासून आपला बचाव करण्यासाठी त्याने दाऊदचा हात धरला होता. तेव्हापासून दाऊदचे आणि त्याचे चांगले संबंध झाले होते.

लढवली लोकसभेची निवडणूक

२०१०मध्ये भंगार माफीया चांद मदार याच्या हत्येप्रकरणी मोहम्मद अलीला अटक करण्यात आली होती. या हत्येसाठी त्याने आर्थिक मदत केली असल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला होता. मात्र या गुन्हयात न्यायालयाने त्याला सोडले होते. त्यानंतर मोहम्मद अली हा तेल व्यवसायातून थोडा दूर झाला होता. त्याने दक्षिण मुंबईतून बसपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.