रस्त्यावर केमिकलचा थर; मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली

153

मुंबई-पुणे महामार्गावर ऑईल टँकर पलटल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक कोलमडली आहे. तर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली निर्माण झाली आहे.

नेमके काय घडले…

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे केमिकल रस्त्याच्या उतारामुळे लांबवर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली असून सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत.

(हेही वाचा – नौका खरेदी करण्याबाबत नौदलाचा ‘या’ कंपनीशी करार! )

वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु

यामुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते एक्सप्रेस वेच्या वलवण येथील एक्झिट पॉईटपर्यत वाहनांच्या रांगा गेल्या आहेत. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. पुण्याकडील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.  ऑईल टँकर पलटल्यावर रस्त्यावरील ऑईलमुळे दुसरा टँकरही पलटल्याची घटना याठिकाणी घडली आहे. यामुळे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वातूक कोलमडली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक लोक रोज मुंबईच्या दिशने प्रवास करत असतात. या मुंबई-पुणे महामार्गावरवर अनेकदा वाहतूक कोंडी पहायला मिळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.