ऋजुता लुकतुके
ओला इलेक्ट्रिकल्स (Ola Electric) ही देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनं बनवणारी आघाडीची कंपनी आहे. यंदाच्या सणाच्या हंगामात कंपनीने आपल्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविष अगरवाल यांनी एक पत्रक काढूनच ओला कंपनीच्या विक्रीचा आकडा प्रसिद्ध केला आहे.
‘या नवरात्री आणि दसऱ्याच्या हंगामात (Ola Electric) आमची विक्री गगनाला भिडली आहे,’ या शब्दांत अगरवाल यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. दर दहा सेकंदांना कंपनीने एक स्कूटर विकली, असं कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नवरात्री विक्रीत २.५ पटींनी वाढ झाल्याचं नमूद केलं आहे.
Our sales have gone through the roof this Dussehra and Navratri! Selling a scooter every 10 seconds right now, and almost 2.5x of last year!😀
India’s EV moment is here this festive season!#endICEage
— Bhavish Aggarwal (@bhash) October 24, 2023
कंपनीच्या वाढलेल्या विक्रीचं कारण सांगताना अगरवाल यांनी लोकांचा इलेक्ट्रिक (Ola Electric) वाहनांकडे वाढलेला ओढा निदर्शनास आणून दिला आहे. कंपनीच्या विक्री विभागाचं तर त्यांनी कौतुक केलं आहे. शिवाय ‘इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा जास्त कल आहे हे स्वागतार्ह आहे,’ असं अगरवाल यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
(हेही वाचा – Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा अन्यथा…; सदावर्तेंचा सरकारला इशारा)
ओला कंपनीने (Ola Electric) या नवरात्री कालावधीत ओला स्कूटरवर अनेक सवलती देऊ केल्या होत्या. तर काही एक्सचेंज ऑफरही त्यांनी आणल्या. ओला एस१ या गाडीवर थेट ७,५०० रुपयांची सूट मिळत होती. तर जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांसाठी कंपनीने एक्सचेंज ऑफर आणली होती. याशिवाय झिरो इएमआय आणि झिरो प्रोसेसिंग फी या योजनेमुळेही कंपनीच्या विक्रीत भर पडली.
शिवाय ओला कंपनीने या सणाच्या हंगामात आपल्या तीन नवीन स्कूटर बाजारात आणल्या आहेत. यातील एस१ प्रकारातील स्कूटर १.४७ लाख रुपये किमतीची आहे. पण, एका चार्जमध्ये ती १९५ किमी पर्यंत चालते. आणि तिचा सर्वोत्तम वेग १२० किमी ताशी इतका आहे. कंपनीने आपल्या गाड्यांवर ५ वर्षांची बॅटरी वॉरंटीही देऊ केली आहे. (Ola Electric)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community