सणासुदीच्या काळात किंवा लग्नकार्यात अनेकदा कंपन्या गिफ्ट हॅंपरच्या नावाखाली आपल्याजवळ असलेला जुना माल ग्राहकांना देतात. गिफ्ट हॅंपरच्या नावाखाली जुन्या आणि मुदत संपलेल्या वस्तू खपवल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना चाप बसण्यासाठी आता केंद्र सरकारने नवी नियमावली तयार केली आहे. याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.
गिफ्ट पॅक केल्याने त्याच्या आत असलेल्या वस्तूंची माहिती दिसत नाही. त्यामुळे त्यांची मुदत संपली आहे की लवकरच संपणार आहे, हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे कंपन्या फसवणूक करतात. हा प्रकार रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नवे नियम जारी केले आहेत.
( हेही वाचा: मुंबईत ‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे छापे; बनावट ईडी अधिका-यांनी केली कोट्यावधींची लूट )
कंपन्यांना गिफ्ट देताना ‘ही’ माहिती द्यावी लागणार
- गिफ्ट हॅम्परमधील सर्व उत्पादनांची माहिती पॅकिंगच्या आवरणावर देणे बंधनकारक आहे.
- एक्सपायरी डेट, उत्पादन कंपनी, पॅकिंग कोणी केले, आयात कोणी केले, वजन, वस्तूंची संख्या तसेच, वस्तू कोणत्या देशात उत्पादित झाली, अशी माहिती देणे बंधनकारक.
- गिफ्ट हॅम्परच्या नावाखाली मुदतबाह्य वस्तू खपवल्यास 10 लाख रुपयांचा दंड आणि 2 वर्षांपर्यंत तुरुगंवास अशा शिक्षेची तरतूद केली आहे.