पुण्यातील चांदणी चौकातला पूल मध्यरात्री पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरू होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री १ वाजेनंतर संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या स्ट्रक्चरला १३०० छिद्रे पाडून त्यामध्ये ६०० किलो स्फोटकं भरण्यात आली होती. यानंतर हा पूल पाडण्यात आला. सध्या या ठिकाणी जमा झालेला मलबा हटवण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. तर पोकलेनच्या सहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटानंतर हा पुल पाडण्यात आल्याने हा रस्ता रिकामा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – भाजपच्या खासदारांनी महापालिका शाळेबाबत केले ‘हे’ विधान!)
पूल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत, अशी माहिती उत्कर्ष मेहता, एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर यांनी दिली आहे. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला. आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत, यासाठी सोडले होते. या पद्धतीला फ्रेग्मेंटेशन असे म्हणतात. जी पद्धत नोएडातील ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती, त्याला इमप्लसिव्ह ब्लास्टिंग असे म्हटले जाते, असे त्यांनी सांगितले.
तर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुण्याहून साताऱ्याकडे येताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या झाली असल्याचे नागरिकांनी मला सांगितले होते. मी त्या भागाचा सर्व्हे केला, त्यानंतर नंतर एनएचआय, पीडब्लूडी अधिकाऱ्यांना सूचना करून या ठिकाणी वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी असेही सांगितले की, कंट्रोल ब्लास्टिंगने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community