‘एकच मिशन- जुनी पेन्शन’! जुन्या पेन्शन योजनेसाठी ४ मार्चला भव्य मोर्चा

प्रातिनिधिक

राज्यात जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कोल्हापुरात ४ मार्च रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. एकच मिशन- जुनी पेन्शन या मागणीसाठी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर आणि शासकीय कर्मचारी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.

( हेही वाचा : सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी! एकनाथ शिंदेंच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद, ठाकरे गटाचा युक्तिवाद)

देशातील ५ राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे महाराष्ट्रात सुद्धा ही योजना लागू करावी, इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सुद्धा हा निर्णय घ्यावा असे सतेज पाटील म्हणाले. या बैठकीदरम्यान नवीन योजना कशी फसवी आहे आणि जुन्या योजनेचे काय फायदे आहेत याविषयी मते मांडण्यात आली.

आर्थिक नियोजनाचा धोका निर्माण होऊ शकतो

सध्या देशातील सुमारे ५ राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आली आहे. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्राला कळवले आहे. दरम्यान जुन्या पेन्शन योजनेबाबत देशात अनेक प्रकारचे अहवाल समोर येत आहेत. नुकतेच आरबीआयने सांगितले होते की, जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या सर्व राज्यांना आगामी काळात आर्थिक नियोजनाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संसदेत म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here