सध्या भारतीय बाजारपेठेत हलाल प्रमाणित उत्पादनांचे स्तोम माजले आहे. या माध्यमातून भारतात इस्लामची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदूंकडून (Hindu) पैसा कमावून तो दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. हे हिंदूंसाठी (Hindu) पर्यायाने राष्ट्रासाठी धोक्याचे बनले आहे. म्हणूनच ‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’ असे ब्रीद असलेली अर्थात हिंदूंचा (Hindu) पैसा हिंदूंकडेच जावा यासाठी ‘ओम प्रमाणपत्रा’ची संकल्पना मांडण्यात आली. मागील वर्षभर राज्यभरात हिंदू (Hindu) व्यापाऱ्यांना ओम प्रमाणपत्र वितरित करून त्यांची नोंदणी करण्याचे कार्य सुरु झाले आहे. ज्यामुळे हिंदू (Hindu) ग्राहकांना त्यांच्या त्यांच्या परिसरात हिंदू व्यापाऱ्यांची माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. आता याला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी हिंदू (Hindu) ग्राहक जागृती अभियानाची जोड देण्यात आली आहे. हिंदू नववर्ष, चैत्र शुक्ल १, रविवार ३० मार्चला गुढीपाडव्यापासून या अभियानाला डोंबिवली येथील शिदोरी उपहारगृह येथून प्रारंभ करण्यात आला. ज्या अंतर्गत ओम प्रमाणित हिंदू ग्राहकांची विनाशुल्क नोंदणी सुरू करण्यात आली.
नववर्ष स्वागतयात्रेत हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा डंका
गुढीपाडवा या हिंदू नव वर्षाचे औचित्य साधून आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, डोंबिवली शाखा आणि ‘ओम प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी मराठे, राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे डोंबिवली शहर प्रमुख मंगेश राजवाडे, प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक अमोल कोगेकर, ओम प्रतिष्ठानचे समन्वयक प्रसाद वडके, ध्रुव अकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे, वृषाली देशपांडे, प्राचार्य डाॅ. विनय भोळे, सनातन संस्थेच्या अमृता संभूस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रघुवीर नगर गणेशोत्सव मंडळाचे डोंबिवली अध्यक्ष बिनेश नायर आणि मंडळाचे सदस्य यांचे विशेष योगदान लाभले. डोंबिवलीतील प्रथम ओम प्रमाणित उद्योजक शिदोरी उपहारगृहाचे संचालक अद्वैत जोशी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने www.ompratishthan.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
(हेही वाचा Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा सृष्टीचा नववर्षारंभ)
हिंदू हिताच्या दृष्टीने विधायक कार्य
या स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या हिंदू (Hindu) धर्माभिमानींनी ओम प्रमाणपत्र आणि हिंदू ग्राहक जागृती अभियानाची माहिती देणारे फलक हाती घेतले होते, तसेच या अभियानाविषयी जागृती करणाऱ्या उद्घोषणाही केल्या जात होत्या. यामुळे अनेकांचे याकडे लक्ष केंद्रित होत असल्याचे दिसून आले. हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी व्हावा, मोठ्या संख्येने हिंदू ग्राहक आणि हिंदू व्यापारी यांचे संघटन यानिमित्ताने निर्माण होऊन हिंदू (Hindu) हिताच्या दृष्टीने विधायक कार्य यानिमित्ताने घडो, अशी अपेक्षा यावेळी अनेक हिंदूंनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community