सोमवारी लातूरमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णाची पहिली नोंद झाली. लातूरमधील ३३ वर्षांच्या रुग्णाच्या शरीरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा विषाणू आढळल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. पुण्यातही ३९ वर्षीय महिलेच्या माध्यमातून ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये नवी भर पडली आहे.
आतापर्यंत राज्यात २० ओमायक्रॉनच्या रुग्णांचे रुग्ण आढळले असून, त्यापैकी ९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे आणि लातूरमधील ओमायक्रॉनच्या ३९ वर्षीय महिलेने आणि ३३ वर्षीय पुरुषाने दुबईत प्रवास केला होता. या दोन्ही रुग्णांचे लसीकरणही पूर्ण झाले होते. दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. दोघांना रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रत्येकी तीन निकटवर्तीयांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
राज्यभरातील कोरोनाचा आकडा घसरला
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सहाशेहून जास्त रुग्णांची दर दिवसाला कोरोनाची नोंद होत होती. सोमवारी ४९८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ५ रुग्णांनी आपला जीव गमावला. हा आकडाही खूप दिवसांनी खालावल्याचे सकारात्मक चित्र सोमवारी दिसून आले. गेले काही दिवस दहापेक्षाही जास्त मृत्यूची नोंद दर दिवसाला होत होती.
( हेही वाचा : सफाई कामगारांना मिळणार १४ हजार रुपये! कसे ते वाचा… )
आतापर्यंत कुठे-कुठे आढळून आलेत ओमायक्रॉनचे रुग्ण
- मुंबई – ५
- पिंपरी-चिंचवड – १०
- पुणे मनपा – २
- डोंबिवली – १
- नागपूर – १
- लातूर १