कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची एन्ट्री! ओमायक्रॉन संसर्गाचा वेग पाचपटीने अधिक

देशभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. तर आता डिसेंबर महिन्याच्या अखेरिसच कोरोनाची तिसरी लाट आल्याचे समोर आले आहे. २६ डिसेंबर रोजी ओमायक्रॉन विषाणूमुळे देशात तिसरी लाट आली असून, या लाटेमध्ये डेल्टा विषाणूचा प्रभाव जवळपास संपला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट पाचपटीने वेगाने पसरत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून दिली गेली.

…म्हणून वाढतोय ओमायक्रॉनचा पसारा 

मात्र, वाढत्या कोरोनाच्या रुग्णांसह व्हायरल फिव्हरचेही रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाची लक्षणे नसली तरीही तापाने हैराण झालेले रुग्ण दरदिवसाला वाढत असल्याची माहिती कन्सल्टिंग फिजिशियन आणि भारतीय आरोग्य सेवा संघटनेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे सचिव डॉ दीपक बैद यांनी दिली. बरेच रुग्ण कोरोना तपासणीसाठी टाळाटाळ करत आहेत. परिणामी ओमायक्रॉनचा पसारा वाढत असल्याचे डॉ बैद यांनी स्पष्ट केले. तापाची तक्रार असेल आणि घरात सर्वांनाच तापाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनाची संपूर्ण कुटूंबाने तपासणी करायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला.

(हेही वाचा – काय सांगताय… आता मंत्रालयाचा नवा पत्ता ‘शिवतीर्थ’!)

व्हायरल फिव्हरची साथ आहे. मात्र कोरोनाची तपासणी करायला हवी, जेणेकरून ताप हा कोरोनामुळे होतोय की नाही, याबाबतचे निदान होईल, असे महाराष्ट्र राज्य मृत्यू सल्लागार समितीचे (कोरोना) डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

प्रयोगशाळांवर ताण

गेल्या दहा दिवसांपासून वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरटीपीआर तपासणी अहवालाला विलंब होत आहे. अहवाल तीन-चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळत आहे. दर दिवसाला रुग्णांच्या चाचण्या वाढत असल्याने अहवालावर लक्ष केंद्रीत करण्याचे आव्हान आता प्रयोगशाळांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे उपचारांनाही दिरंगाई होण्याची भीती आहे. बाजारात उपलब्ध रॅपिड एण्टिजन तपासणीच्या माध्यमातून कोरोना तपासणी करुन घ्यावी. निदान उपचार सुरु करता येतील, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संघटनेचे माजी सचिव, डॉ. पार्थिव सांघवी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here