ओमिक्रोन विषाणू ओळखायला सोपा, पण आवरायला कठीण!

118

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन या विषाणूचा प्रसार वेगाने होत असताना, हा विषाणू कोरोना रुग्णाच्या शरीरात सहज ओळखता येत असल्याने शास्त्रज्ञांनी थोडा सुटकेचा श्वास घेतला आहे. हा विषाणू आरटीपीसीआर तपासणीत सहज दिसत असल्याचं मत शास्त्रज्ञांच्या वर्तुळातून व्यक्त होते आहे. मात्र ओमिक्रोन, डेल्टा विषाणूच्या तुलनेत अधिक वेगाने पसरत असल्याची भीतीही तपासातून निष्पन्न होते आहे.

कोरोना चाचणीत ‘एस’ हा जनुकीय घटक ओमिक्रोन विषाणूत आढळत नसल्याने तपासणीची प्रक्रिया सोपी झाल्याचे अमेरिकेतील ओमिक्रोन विषाणूच्या शोधासाठी वेगाने सुरु असलेल्या कोरोना चाचणीतून दिसून येत आहे. मात्र ओमिक्रोनमुळे मृत्यूदरात कितपत वाढ होईल, याबाबतचा आवश्यक माहिती अजून मिळायची बाकी असल्याची कबुलीही शास्त्रज्ञांनी दिली आहे.

कोरोनाची तपासणी कशी होते?

रुग्णाच्या नाकातील द्रव (श्लेमा) (इंग्रजीत – म्युकस) ट्यूबच्या माध्यमातून घेतला जातो. या द्रवाला (श्लेमा) विशिष्ट रासायनिक द्रव्यात डुबवलं जातं. संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान बारा तासांचा अवधी लागतो. या प्रक्रियेनंतर रुग्ण कोरोनाबाधित आहे की नाही, हे समजतं. पीसीआर मशीनमधील विशिष्ट द्रव्यात बुडवल्यानंतर एस नामक जनुकीय घटक दिसत नाही. एस जनुकीय घटक आढळल्यानंतर डेल्टा विषाणूचं निदान होतं. एस जनुकीय घटक नसल्यामुळे तपासणी प्रक्रिया लवकर पूर्ण होते आणि रुग्ण कोरोनाबाधित असल्याच शरीरातील विषाणू ओमिक्रोनचा असल्याचं निष्पन्न होतंय.

डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रोन सहज सापडतोय

पीसीआर मशीनमध्ये द्रव बुडवल्यानंतर तपासणीला फारच कमी वेळ लागतोय. परंतु एस जनुकीय घटक दिसत नसल्यानं कोरोना तपासणी अधिक लवकर पूर्ण होतेय.

( हेही वाचा : नव्या विषाणूला ओमिक्रॉन नाव कसे पडले? जाणून घ्या… )

भारतीय डॉक्टरांचे मत 

ओमिक्रोन विषाणूमुळे रुग्णाच्या शऱीरात काय बदल घडतील, याबाबतची अद्यापही माहिती उपलब्ध नाहीय. हा विषाणू कितपत घातक ठरु शकते, याबाबतचा अभ्यासह अद्याप झालेला नाहीय. ओमिक्रोनबाबत विषाणूचा अभ्यास सुरुय. रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवरही हा विषाणू कितपत परिणामकारक ठरेल, हे अभ्यासाअंती समजेल, असे राष्ट्रीय टास्क फोर्स समिती डॉक्टर राहुल पंडीत यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञांचं मत 

सर्वात पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूच्या तुलनेत डेल्टा विषाणूचा वेग दुप्पटीने होता. मात्र ओमिक्रोन डेल्टाच्याही अधिक वेगाने पसरतोय. ओमिक्रोनमुळे रुग्ण कितपत आजारी पडणार किंवा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती घालवणार, याबाबत अद्यापही माहिती मिळण्यासाठी पुरेसा अभ्यास होणे बाकी आहे, असे रिझॉल्व्ह टू सेव्ह लाइफचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर टॉम फ्रिडॅन यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.