Girl Fight Viral Video: एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या चक्क पाच तरुणी

96

बिहारच्या सोनपूरच्या जत्रेत सोमवारी एक विचित्र प्रकार घडला. येथे पाच तरुणी एक बाॅयफ्रेंडसाठी एकमेंकांशी भिडल्या. जत्रेत संध्याकाळी एक तरुणी तिच्या बाॅयफ्रेंडसोबत फिरत असताना चार तरुणींनी त्यांच्यावर हल्ला केला.

यात्रेत फिरणा-या मुलीसह तिच्या बाॅयफ्रेंडवर या 4 हल्लेखोर मुलींची नजर पडताच त्यांचा तिळपापड झाला. त्यातून त्यांनी त्या मुलीवर हल्ला केला. हाणमारीत कपडेही फाटले. मुलींमधील भांडणाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे म्हटले जाते की, आपल्या बाॅयफ्रेंडला दुस-या मुलीबरोबर फिरताना पाहिल्यामुळे ही मारहाण झाली. मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही प्रसाद मिळाला. सर्वांसमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. मुलीचे केस ओढून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न झाला. मुलींची ओळख अद्याप पटलेली नाही.

https://twitter.com/IamSuVidha/status/1597534010728935424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1597534010728935424%7Ctwgr%5E297fea624f5c47d276553dc29219b5213433da37%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Ftrending%2Ffive-girls-fight-in-bihar-sonpur-fair-for-one-boyfriend-2270209

ही खासगी बाब

यात्रेत तगडा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडली. व्हिडीओबाबत माहिती जनसंपर्क अधिकारी कन्हैयाकुमार यांनी सांगितले की, अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. म्हणजे ही खासगी बाब आहे. त्यात प्रशासनाने मात्र हा प्रकार बाॅयफ्रेंडमुळे झाल्याचे म्हटले आहे. व्हिडीओची प्रशासनाकडून चौकशी सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.