रविवारी राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्ण नोंदीचा आकडा ४१ हजार ३२७ वर दिसून आला. तर एका दिवसांत ४० हजार ३८६ रुग्ण घरी बरे होऊन गेले. डिस्चार्ज आणि नव्या रुग्ण नोंदीत केवळ एक हजाराचा फरक पहिल्यांदाच दिसून आला. पहिल्यांदाच मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. परिणामी, एकूण रुग्णसंख्याही नियंत्रणात राहिली.
राज्यातील कोरोनाची स्थिती
रविवारच्या डिस्चार्ज संख्येमुळे एकूण राज्यातील एकूण रुग्णसंख्या केवळ एक हजाराने वाढली. राज्यात केवळ २ लाख ६५ हजार ३४६ सक्रीय कोरोनाचे रुग्ण सध्या विविध भागांत उपचार घेत आहेत. मृत्यूदराचा टक्काही १.९६ टक्क्यांवर नोंदवला गेला. राज्यात रविवार २९ कोरोनाच्या रुग्णांनी जीव गमावला. मुंबईत ११, नवी मुंबईत, सांगली, जालना, बीड, गडचिरोलीत आणि पुण्यात प्रत्येकी १ तर नाशिक आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी २, साता-यात ४ तर सोलापूरात ३ जणांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – महापालिकेच्या ‘या’ विभागांच्या प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची खांदेपालट)
पुणे-पिंपरीचिंचवडमध्ये ओमायक्रॉन
रविवारी पुण्यात ओमायक्रॉनचे ५ तर पिंपरी चिंचवडमध्ये ३ नवे ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या ८०६ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
- राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या – २ लाख ६५ हजार ३४६
- राज्यातील आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या – ७२ लाख ११ हजार ८१०
- राज्यातील आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ६८ लाख ९००
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९४.३ टक्के